तुमच्या पैशांवर कोणाची नजर? रुपयाचा हिशोब देशातील 10 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्यांची यादी समोर

High Net Worth Individuals : एखाद्याकडे श्रीमंती असावी तरी किती... देशातील कोट्यधीशांचा आकडा पाहून तुम्हालाही काहीच सुचणार नाही. 

सायली पाटील | Updated: Sep 18, 2024, 10:59 AM IST
तुमच्या पैशांवर कोणाची नजर? रुपयाचा हिशोब देशातील 10 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्यांची यादी समोर  title=
High Net Worth Individuals rich indians earning 10 crores know latest update

High Net Worth Individuals : श्रीमंतांच्या यादीत भारतीयही मागे नसून, आता या यादीमध्ये काही मोठे बदलही करण्यात आले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे देशात कोट्यधीशांची संख्या वाढली असून, मागील पाच वर्षांमध्ये 10 कोटी रुपयांहून अधिक कमाई करणाऱ्या भारतीयांच्या एकूण संख्येमध्ये तब्बल 63 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

सेंट्रम इंस्टीट्यूशनल रिसर्च (Centrum Institutional Research)च्या वतीनं जाहीर करण्यात आलेल्या एका अहवालातून यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध करण्यात आली. या माहितीनुसार वर्षाला 5 कोटी आणि त्याहून जास्त कमाई करणाऱ्यांच्या संख्येत 49 टक्क्यांनी वाढ झाली असून, हा आकडा आता 58200 वर पोहोचला आहे. 

50 लाखांहून अधिक कमाई करणाऱ्यांचा आकडा मोठा... 

संशोधनपर अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार वर्षाला 50 लाख रुपये इतकं वार्षिक उत्पन्न असणाऱ्या भारतीयांचा एकूण आकडा 25 टक्क्यांनी वाढला असून, 10 लाख लोकांचा यात समावेश आहे. अहवालातील माहितीनुसार 10 कोटी आणि त्याहून अधिक कमाई करणाऱ्यांच्या आकड्यामध्ये 2018-19 ते 2023-24 या आर्थिक कालावधीत दरवर्षी सरासरी 121 टक्क्यांनी वाढ झाली असून, या मंडळींची एकूण संपत्ती 38 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. 

हेसुद्धा वाचा : Lebanon Pager Attack Explainer: 3.30 वाजता मेसेज आला, 'बीप' आवाज झाला आणि... 'मोसाद स्टाईल' हल्ल्याची इनसाईड स्टोरी

5 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्यांचा आकडा 106 टक्क्यांनी वाढला असून, या श्रेणीमध्ये येणाऱ्यांची एकूण संपत्ती 40 लाख कोटी इतकी आहे. तर, 50 लाख रुपयांचं वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांच्या एकूण संपत्तीचा आकडा 49 लाख कोटी रुपयांच्या घरात आहे. 

सेंट्रमच्या या अहवालानुसार 10 कोटींहून अधिक वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांच्या संख्येत मागील पाच वर्षांमध्ये 63 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अहवालानुसार देशात 31800 मंडळी एका वर्षात 10 कोटींहून अधिक कमाई करतात. थोडक्यात काय, तर भारतात श्रीमंतांची श्रीमंती दिवसागणिक वाढतच चालली आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही.