Guinness World Records : गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड (Guinness World Records) अर्थात विश्वविक्रम रचण्याची अनेकांची इच्छा असते. कुणी खेळात, कुणी खाण्यात तर कुणी कल्पनाही करुच शकत नाही अशा प्रकारचे विश्वविक्रम रचतात. भारतीय अभिनेत्याने आणि एका मार्शल आर्ट्स एक्सपर्टने असाच एक भयानक विश्वविक्रम रचला आहे. 528 किलो वजनाचे दगड स्वत:च्या पोटावर फोडले आहे. यांच्या या अनोख्या विश्व विक्रमाचा व्हिडिओ पाहून अंगावर काटा येत आहे.
साहिल खान (Sahil Khan) असे या गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड (Guinness World Records) रचणाऱ्या अभिनेत्याचे नाव आहे. साहिल आणि विस्पी खराडी (Vispy Kharadi) या दोघांनी मिळून या गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड बनवला आहे. साहिल खान हा फिटनेस आयकॉन तसेच बॉलीवुड अभिनेता देखील आहे. तर, विस्पी खराडी हा मार्शल आर्ट्सचा एक्सपर्ट आहे. साहिल खान आणि विस्पी खराडी या दोघांनी मिळून तब्बल 13 पेक्षा अधिक वर्ल्ड रिकॉर्ड रचले आहेत.
साहिल खान आणि विस्पी खराडी यांनी रचला थरकाप उडवणारा विक्रम
साहिल खान आणि विस्पी खराडी यांनी एक भयानक विस्व विक्रम रचला आहे. विस्पी खराडीने 528 किलो वजनाचे दगड पोटावर फोडले आहेत. याचा व्हिडिओ Guinness World Records ने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.
अत्यंत भयानक आणि काळजाचा ठोका चुकवणारा असा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये विस्पी लोखंडी खिळ्याचे आच्छादन असलेल्या एका पृष्ठभागावर झोपतो. यानंतर तशाच प्रकारचे दुसरे अच्छादन त्याच्या पोटावर ठेवण्यात येते. यानंतर या यावर तब्बल 528 किलो वजन असलेले दगडाचे तीन मोठे मोठ ब्लॉक त्याच्या पोटावर ठेवण्यात येतात. यांनंतर साहील मोठ्या हतोडीच्या सहय्याने हे दगडाचे ब्लॉक फोडत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
3.14 मिनीटांचा हा व्हिडिओ काळजाचा ठोको चुकवणारा असा आहे. Guinness World Records च्या टीम समोर साहिल खान आणि विस्पी खराडी या दोघांनी अनोखा विश्वविक्रम रचला आहे. या दोघांच्या या कामगिरीपुडे मोठे मोठे पैलवान देखील फेल ठरतील. या विक्रमक पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली झाली होती.
New record: Heaviest concrete block break on a bed of nails sandwich (male) - 528 kilograms by Vispy Kharadi and Sahil Khan (India) pic.twitter.com/jfKKbPVrp4
— Guinness World Records (@GWR) February 10, 2023