WHO New Report : राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यात भारतात कंडोमशिवाय (Condom) सेक्स करण्याचा ट्रेंड वाढत चालल्याचं नमुद करण्यात आलं आहे. यावर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) चिंता व्यक्त केली आहे. याशिवाय कोणत्या राज्यांमध्ये कंडोमचा वापर जास्त केला जातो? याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसंच शारीरिक संबंधांदरम्यान (Physical Relations) कंडोमचा वापर पूर्वीच्या तुलनेत आता कमी होत असल्याचं अहवालात म्हटलं आहे. कंडोमच्या वापराबाबत आरोग्य विभाग सातत्याने लोकांना जागरूक करत आहे. पण कंडोमबद्दल सार्वजनिक बोलणं लाजीरवाणं वाटत असल्याने लोकं अधिक गुप्तता पाळत आहेत. त्यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या वाढत आहेत, असं या अहवालात नमुद करण्यात आलंय.
भारतातील दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील जोडपी कंडोमचा सर्वाधिक वापर करतात, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे इथे लैंगिक संबंधांबाबत अधिक जागरूकता आहे.राष्ट्रीय कुटुंब आरोग्य विभागाने एक सर्वेक्षण केलं होतं. या सर्वेक्षणात दादरा नगर हवेलीत 10 हजार जोडप्यांपैकी 993 जोडपी शारीरिक संबंधांवेळी कंडोमचा वापर करतात असं समोर आलं आहे. देशातील अनेक राज्यात हे सर्वेक्षण करण्यात आलंय. दुसऱ्या क्रमांकावरआंध्र प्रदेशचा नंबर लागतो. आंध्रात 10 हजार जोडप्यांपैकी 978 जोडपी कंडोमचा वापर करतात. तर कंडोमचा सर्वात कमी वापर कर्नाटकमध्ये होते. इथे 10 हजार जोडप्यांपैकी केवळ 307 जोडपी शारीरिक संबंधांवेळी कंडोमचा वापर करतात.
6 टक्के लोकांना कंडोमबद्दल माहिती नाही
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अहवालात भारतातील सहा टक्के लोकांना कंडोमबद्दल माहिती नसल्याचं समोर आलं आहे. भारतात दरवर्षी जवळपास 33.07 कोटी कंडोची विक्री होते. उत्तर प्रदेशमध्ये दरवर्षी 5.3 कंडोमची विक्री होते. इतर राज्यांच्या तुलनेत हा आकडा जास्त आहे. उत्तर प्रदेशमध्ये सरकारी रुग्णालयात कंडोमची मोफत विक्री केली जाते. पण अहवालानुसार गेल्या काही वर्षात उत्तर प्रदेशमध्येही कंडोमचा वापर घटला आहे.
पुद्दुचेरीत 10000 जोडप्यांपैकी 960, पंजाबमध्ये 895, चंदीगड 822, हरियाणा 685, हिमाचल प्रदेश 567, राजस्थान 514 आणि गुजरातमधअये 430 जोडपी शारीरिक संबंधांवेळी कंडोमचा वापर करत असल्याचं राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अहवालात समोर आलं आहे.