Health Insurance चे 'हे' फायदे तुम्हाला माहितीय का? जाणून घ्या

आरोग्य विमा ही काळाची गरज बनली आहे.

Updated: Jun 29, 2022, 05:45 PM IST
Health Insurance चे 'हे' फायदे तुम्हाला माहितीय का? जाणून घ्या title=

मुंबई :  आपल्याला कोणताही आजार नाही आणि होणार नाही असा विचार करून बरेच लोक आरोग्य विमा खरेदी करणे टाळतात. मात्र ज्यावेळेस या लोकांच्या हातात हॉस्पिटलचे भले मोठं बिल येत, यावेळीस त्यांना आरोग्य विमा खरेदी करण्याचे फायदे कळतात. तूमच्याही बाबतीत असे घडू नये असे तुम्हाला वाटतं असेल तर आताच ही बातमी वाचा आणि विमा खरेदी करा.  (health insurance important before buying policy keep this thing in mind)

का खरेदी करावा विमा?

आरोग्य विमा ही काळाची गरज बनली आहे.आरोग्य विमा हा एक विम्याचा प्रकार आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या वैद्यकीय आणि शस्त्रक्रियेच्या खर्चासाठी दावा करू शकता. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, आजारपणात हॉस्पिटलायझेशन आणि औषधांचा खर्च तुमच्या खिशातून जाणार नाही. हा संपूर्ण खर्च तुमच्या पॉलिसीनुसार विमा कंपनी उचलते. 

कसा काम करतो विमा?

आरोग्य विमा प्रदान करणाऱ्या विमा कंपन्यांचे प्रमुख रुग्णालयांशी करार असतात. ज्यामुळे विमाधारकांना कॅशलेस उपचार प्रदान करता येतात.तथापि, जर त्या विमा कंपनीचा रुग्णालयाशी करार नसेल, तर ती पॉलिसीधारकाला त्याच्या उपचारांवर खर्च केलेल्या बिलांच्या आधारे परतफेड मिळते. 

आरोग्य विमा का गरजेचा?

आरोग्य विमा घेणे तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी खुप फायदेशीर ठरू शकते. जर तुम्ही विमाधारक असाल, तर तुम्हाला कॅशलेस उपचार मिळू शकतात, तर विमा पॉलिसीमध्ये ६० दिवसांच्या कालावधीसाठी हॉस्पिटलायझेशन पूर्व आणि नंतरचे शुल्क देखील समाविष्ट असते. तसेच रूग्णाच्या वाहतुकीसाठी रुग्णवाहिकेची रक्कम देखील यामध्ये समाविष्ट आहे. विमा पॉलिसीमध्ये आरोग्य तपासणीचे पर्यायही दिले जातात. 

आरोग्य विमा कसा निवडावा? 

विमा पॉलिसी घेण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करायला हवा. तुमच्या गरजेनुसार तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबाला कव्हर करणारी पॉलिसी देखील निवडू शकता. विमा कंपनीचे क्लेम सेटलमेंट रेशो नक्की तपासा. पॉलिसीमध्ये दिलेल्या नेटवर्क हॉस्पिटल्सची यादी नीट तपासा. तुमच्या पॉलिसीमध्ये कॅशलेस पेमेंट आणि रिइम्बर्समेंट या दोन्ही गोष्टींचा समावेश असल्याची खात्री करा.

ही कागदपत्रे आवश्यक 

आरोग्य विमा घेताना वयाचा पुरावा, ओळखीचा पुरावा, पत्ता पुरावा आणि पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक आहे. तुमच्या गरजेनुसार तुम्ही वैयक्तिक किंवा कौटुंबिक विमा घेऊ शकता. याशिवाय, ज्येष्ठ नागरिकांसाठी, शस्त्रक्रिया आणि इतर गंभीर आजारांसाठी पॉलिसी घेऊ शकतात