HDFC बॅंक ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, फ्रि होणार ही सेवा

प्रायव्हेट सेक्टरमधील दुसरी सर्वात मोठी बॅंक असलेल्या एचडीएफसी बॅंकने आपल्या ग्राहकांना आनंदाची बातमी दिलीये. बॅंकेने कॅशलेस ट्रान्झॅक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी ऑनलाइन ट्रान्झॅक्शनचे चार्ज हटवले आहेत.

Updated: Nov 7, 2017, 02:02 PM IST
HDFC बॅंक ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, फ्रि होणार ही सेवा title=

नवी दिल्ली : प्रायव्हेट सेक्टरमधील दुसरी सर्वात मोठी बॅंक असलेल्या एचडीएफसी बॅंकने आपल्या ग्राहकांना आनंदाची बातमी दिलीये. बॅंकेने कॅशलेस ट्रान्झॅक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी ऑनलाइन ट्रान्झॅक्शनचे चार्ज हटवले आहेत.

आता ग्राहकांना NEFT आणि  RTGS सेवा वापरताना कोणताही चार्ज लागणार नाहीये. पण बॅंकेत जाऊन ट्रान्झॅक्शन करणा-यांचा चार्ज लागेल. याआधी बॅंक २ ते ५ लाख रूपयांच्या RTGS ट्रान्झॅक्शनसाठी २५ रूपये चार्ज करत होते. तेच ५ लाखांवरील ट्रान्झॅक्शनसाठी ५० रूपये चार्ज लागत होता. आता ही सेवा मोफत झाली आहे. १ नोव्हेंबरपासून तुम्हाला कोणताही चार्ज लागणार नाहीये. 

NEFT वर कोणताही चार्ज नाही

बॅंकेच्या NEFT सर्व्हिसच्या माध्यमातून १० हजार रूपयांपर्यंतच्या ट्रान्झॅक्शनसाठी २.५ रूपये चार्ज घेतला जात होता. तर १० हजार ते १ लाखांपर्यंत ५ रूपये चार्ज लागत होता. तसेच १ लाख ते २ लाखांच्या ट्रान्झॅक्शनसाठी १५ रूपये चार्ज लागत होता. आणि २ लाखांच्यावर रकमेसाठी २५ रूपये चार्ज घेतला जात होता. 

चेकचा वापर करणे झाले महाग

NEFT आणि RTGS चा वापर वाढण्यासाठी बॅंकेने चेकची फि वाढ्वली आहे. आता ग्राहकांना वर्षाला २५ चेक असलेलं एक चेकबुक मिळेल. याआधी वर्षातून दोन चेकबुक दिले जात होते. आता जर तुम्हाला जास्तीचं चेकबुक हवं असेल तर ७५ रूपये चार्ज भरावा लागेल. 

चेक बाऊंस झाल्यास चार्ज 

खात्यात आता आवश्यक बॅलन्स नसल्याने चेक बाऊंस होतो. आता त्यासाठी अतिरिक्त चार्ज द्यावा लागेल. बॅंक आता प्रत्येक बाऊंस चेकवर ५०० रूपये फि आकारणार आहे. तेच जर चेक डिपॉझिट झाल्यावर परत गेला तर त्यावर १०० रूपयांऎवजी २०० रूपये चार्ज भरावा लागणार आहे.