नोटाबंदी आणि जीएसटीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मोडला : मनमोहन सिंग

 नोटाबंदी आणि जीएसटी या दोन्ही गोष्टींमुळं भारतीय अर्थव्यवस्थेचा कणाच मोडल्याची टीका माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलीय.

Updated: Nov 7, 2017, 01:36 PM IST
नोटाबंदी आणि जीएसटीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मोडला : मनमोहन सिंग  title=

मुंबई : नोटाबंदी आणि जीएसटी या दोन्ही गोष्टींमुळं भारतीय अर्थव्यवस्थेचा कणाच मोडल्याची टीका माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलीय.

नोटाबंदीला 8 नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. नोटाबंदीचा निर्णय म्हणजे संघटीत लूट आणि अधिकृत घोडचूक असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केलाय.

नोटाबंदीनंतरच्या वर्षभरात चीनमधून वाढलेली आयात हे भारतातल्या ढासळलेल्या औद्योगिक क्षेत्राचं लक्षण असल्याचंही ते म्हणाले. अहमदाबादमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप करत गुजरात निवडणुकीच्या रणसंग्रामात उडी घेतलीय. 

गुजरात निवडणूक ही प्रतिष्ठेची झाली आहे. यामध्ये भाजपाकडून अमित शहांनीदेखील उडी घेत आजपासून  'गुजरात गौरव महासंपर्क अभियाना'ला सुरुवात केली आहे.