तुम्हालाही आलाय का हा SBI चा मेसेज, सावधान! बँकेकडून अलर्ट जारी

SBI कडून ग्राहकांसाठी अलर्ट! ही चूक करू नका नाहीतर पडेल महागात

Updated: Jun 21, 2022, 01:43 PM IST
तुम्हालाही आलाय का हा SBI चा मेसेज, सावधान! बँकेकडून अलर्ट जारी title=

मुंबई : अचानक लॉटरी लागल्याचा मेसेज आला तर आपल्याला आनंद होईल. एवढा आनंद की आपण तो मेसेज कुठून आला खरंच लॉटरी लागली का? हे देखील पाहाणं सोडून देऊ. पण तुम्हाला जर असा मेसेज आला असेल तर सावधान! कारण हा मेसेज तुमच्या आनंदात विरजण घालू शकतो. 

तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाकडून लॉटरीचा कोणताही मेसेज आला असेल तर सावधान! त्यावर क्लीक करू नका. कारण हा मेसेज फेक असल्याचं बँकेकडून सांगण्यात आलं आहे. तुम्हाला फसवण्यासाठी हॅकर्सचा हा डाव आहे. 

तुम्हा अशा मेसेजकडे दुर्लक्ष करा. कारण तुम्हाला फसवण्यासाठी SBI च्या नावाने मेसेज केला जात आहे. या मेसेजवर विश्वास ठेवू नका. अशा प्रकारची कोणतीही लॉटरी SBI ने काढलेली नाही असंही SBI कडून सांगण्यात आलं आहे. 

SBI ने आपल्या ग्राहकांना SMS कडून अलर्ट जारी केला आहे. अशा प्रकारचा मेसेज तुम्हालाही आला असेल तर दुर्लक्ष करण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे तुम्हालाही जर असा मेसेज आला असेल तर आजच सावध व्हा. अशा कोणत्याही लिंकवर क्लीक करू नका आणि आपली माहिती कोणालाही शेअर करू नका.