प्रद्युमन हत्या प्रकरण, हरियाणा पोलिसांची टीम मुंबईत दाखल

याप्रकरणी हरियाणा पोलीसांची एक टीम आज मुंबईत दाखल झालीय. रायन इंटरनॅशेनलच्या मुख्यालयात ही टीम चौकशी करणार आहे. 

Updated: Sep 11, 2017, 02:25 PM IST
प्रद्युमन हत्या प्रकरण, हरियाणा पोलिसांची टीम मुंबईत दाखल title=

गुरूग्राम : हरियाणातल्या गुरुग्राममध्ये शाळेच्या बाथरूममध्ये सात वर्षीय प्रद्युमनची हत्येच्या प्रकरणात पोलीस तपासाला कमालीचा वेग आलाय. याप्रकरणी हरियाणा पोलीसांची एक टीम आज मुंबईत दाखल झालीय. रायन इंटरनॅशेनलच्या मुख्यालयात ही टीम चौकशी करणार आहे. 

प्रद्युमनचा गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनलमध्येच खून झाला होता. याप्रकरणी पोलीसांना प्रद्युमनच्या शाळेत काम करणाऱ्या बस चालकाला अटक केलीय. त्यानंही आपला गुन्हा कबुल केलाय. पालकांनी या सगळ्या प्रकरणात शाळा व्यवस्थापकांवर हलगर्जीपणाचा आरोप केलाय. दरम्यान आजही गुरुग्राममध्ये प्रद्युमनची शाळा बंद असून, पालकांनी व्यवस्थापनावर कारवाईच्या मागणीसाठी आजही आंदोलन केलं.