व्हिडिओ : दारुच्या नशेत तर्र पोलिसांचा हंगामा

 दारूच्या नशेत असलेले पोलीस दिसून येत आहेत. या घटनेनंतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबनही करण्यात आले आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Nov 18, 2017, 03:56 PM IST
 व्हिडिओ : दारुच्या नशेत तर्र पोलिसांचा हंगामा  title=

नवी दिल्ली : हरियाणाच्या पानीपतमध्ये दारुच्या नशेत धूंद असलेल्या दोन पोलिसांनी ढाब्यापर हंगामा केला.  न्यूज एजन्सी एएनआयने यासंबंधीचा व्हिडिओ ट्विट केला आहे. यामध्ये दारूच्या नशेत असलेले पोलीस दिसून येत आहेत. या घटनेनंतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबनही करण्यात आले आहे.

व्हिडिओ काढणाऱ्या माणसासोबत दोन पोलीस कर्मचारी भांडण करत आहेत. त्यातील एका पोलिसाच्या हातात ५०० ची नोट असून या नोटेचा व्हिडिओ बनविण्यास सांगत आहे. ते एवढ्या नशेत आहेत की पोलीस व्हॅनमधून उतरुन बाहेरच्या माणसांशी वाद घालण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. 

यानंतर नशेत दिसणारा पोलीस कर्मचारी त्याने दारु न प्यायल्याचा दावा करत आहे. पाहिजे तर माझी मेडिकल टेस्ट करा असेही तो सांगत आहे. नशेतील या पोलिसांना सावधान विश्राम करण्यासही जमले नाही. 

चौकशीचे आदेश

'आम्ही दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश दिल्याचे' समालखाचे डिएसपी नरेश अहलावत यांनी सांगितले.