'पद्मावत' प्रकरणी हरीश साळवेंना धमकी

 'पद्मावत' प्रकरणी सुप्रीम कोर्टात प्रतिवाद्यांचे वकिलपत्र घेतल्याने त्यांना धमकी मिळाली. 

Updated: Jan 20, 2018, 03:20 PM IST
 'पद्मावत' प्रकरणी हरीश साळवेंना धमकी title=

नवी दिल्ली :  वरिष्ठ अधिवक्ता हरीश साळवे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिल्ली पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. 'पद्मावत' प्रकरणी सुप्रीम कोर्टात प्रतिवाद्यांचे वकिलपत्र घेतल्याने त्यांना धमकी मिळाली.

याप्रकरणी प्राथमिक तक्रार दाखल केली असून प्रकरणाची अधिक चौकशी सुरू असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितली.

धमकीचे फोन 

 संजय लीला भन्साली यांच्या सिनेमातील वादग्रस्त दृश्य हटविण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली. दरम्यान साळवे यांनी एका प्रतिवाद्याचे प्रतिनिधित्व केले.

त्यांना आपल्या ऑफिसमध्ये धमकीचे फोन आले आणि सिनेमाच्या बाजूने बोलण्याची धमकी देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

राष्ट्रपतींना भेटणार 

 दुसरीकडे रजपूत करणी सेना या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात डबल बेंचमध्ये याचिका दाखल करणार आहे.

सिनेमावर बंदी लागण्यासाठी आम्ही राष्ट्रपतींना भेटणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडीने सांगितले.

हजारो महिलांचे आंदोलन 

 या सिनेमावर रिलीज होऊ देणार नाही. २४ जानेवारीला चित्तोडगढमध्ये हजारो महिला आंदोलन करणार असून देशभरात निदर्शने होणार असल्याचे त्यांनी सांगितले.