भाजपने माझी बनावट सेक्स सीडी तयार केली - हार्दिक पटेल

गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जसजशा जवळ येत आहेत तसतसं राजकारणही चांगलचं तापताना दिसत आहे. पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल याने भाजपवर एक गंभीर आरोप केला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 4, 2017, 06:52 PM IST
भाजपने माझी बनावट सेक्स सीडी तयार केली - हार्दिक पटेल  title=

नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जसजशा जवळ येत आहेत तसतसं राजकारणही चांगलचं तापताना दिसत आहे. पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल याने भाजपवर एक गंभीर आरोप केला आहे.

भाजपने निवडणुका जिंकण्यासाठी शडयंत्र रचलं आहे. मला बदनाम करण्यासाठी माझी खोटी सेक्स सीडी तयार केली असल्याचा आरोप हार्दिक पटेलने केला आहे.

हार्दिक पटेलने म्हटलं की, "भाजपने मला बदनाम करण्यासाठी एक सेक्स सीडी तयार केली आहे. निवडणुकांपूर्वी ही सीडी प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे. भाजप यापेक्षा वेगळं काही करुच शकत नाही."

हार्दिक पटेलने वोटिंग मशीनवर प्रश्न उपस्थित केले आहेत. गुजरात निवडणुकीत खराब व्हीव्हीपीएटी यंत्रांचा वापर केला जाऊ शकतो. निवडणूक आयोगाने केलेल्या तपासणीत ३५५० व्हीव्हीपीएटी यंत्र नादुरुस्त असल्याचं समोर आलं होतं.

हार्दिक पटेलने ट्विट करत म्हटलं की, मी दावा करुन सांगतो की भाजप येत्या निवडणुकांमध्ये घोळ करुन जिंकू शकते. गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये पूर्णपणे व्हीव्हीपीएटी यंत्रांचा वापर करत मतदान करण्यात येईल.