मेहसणा : पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांना बुधवारी न्यायालयाने जोरदार दणका दिलाय. भाजप आमदार ऋषिकेश पटेल यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी वीसनगरच्या सत्र न्यायालयाने हार्दिक पटेल यांना दोषी ठरवले आहे. न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच या तोडफोड प्रकरणी आमदार ऋषिकेश पटेल १ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेशही न्यायलयाने दिलेत.
Mehsana: Visnagar Court pronounces Hardik Patel guilty in a case related to vandalising BJP legislator Rushikesh Patel’s office in Visnagar during 2015 Patidar protests. #Gujarat (file pic) pic.twitter.com/IB5PN67zkI
— ANI (@ANI) July 25, 2018
मेहसाणा जिल्ह्यातील वीसनगरमध्ये २३ जुलै २०१५ रोजी भाजप आमदार ऋषिकेश पटेल यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. यापूर्वी हर्दिक पटेल यांच्यासह लालजी पटेल आणि अन्य काही जणांविरुद्ध न्यायालयाने अटक वॉरंट काढले होते. गुजरात विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच वीसनगरच्या सत्र न्यायालयाने हार्दिक पटेलच्या विरुद्ध अटक वॉरंट काढले होते. दरम्यान, न्यायालयाने याप्रकरणात हर्दिक पटेलसह लालजी पटेल आणि अन्य एकाला दोषी ठरवले आहे.