कोलकाता : आयपीएलच्या 11 व्या सीजनमध्य़े हैदराबाद आणि कोलकातामध्ये फायनलसाठी सुरु असलेल्या सामन्यात हैदराबादने कोलकाता समोर 175 रनचं टार्गेट ठेवलं आहे. ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये सुरु असलेल्या या महत्त्वाच्या सामन्यात टॉस हारल्यानंतर आधी बॅटींग करण्यासाठी आलेल्या हैदराबादने 20 ओव्हमध्ये 7 विकेट गमवत 174 रन केले.
हैदराबादकडून राशिद खानने शेवटच्या 10 बॉलमध्ये 34 रन केले. ज्यामध्ये चार सिक्स आणि 2 फोरचा समावेश आहे. हैदराबादसाठी ऋद्धिमान साहाने सर्वाधिक 35 रन केले. त्याने यासाठी 27 बॉलचा सामना केला. शिखर धवनने 24 बॉलमध्ये चार फोर आणि एक सिक्सच्या मदतीने 34 रन केले.
शाकिब अल हसनने 28 आणि दीपक हुड्डाने 19 रन केले. कोलकातासाठी कुलदीप यादवने दोन विकेट घेतले. पीयूष चावला, सुनील नरेन आणि शिवम मावी यांनी एक-एक विकेट घेतली.