Assembly Election Results: 2022 चे निकाल येण्याआधी 2017 मध्ये गुजरात- हिमाचलमध्ये काय चित्र होतं माहितीये?

Assembly Elections 2022  : गुजरात (Gujarat), हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. यंदाचे निकाल हाती येण्यापूर्वी जरा डोकावूया मागील पर्वाच्या निकालांकडे... 

Updated: Dec 8, 2022, 10:02 AM IST
Assembly Election Results: 2022 चे निकाल येण्याआधी 2017 मध्ये गुजरात- हिमाचलमध्ये काय चित्र होतं माहितीये?  title=
gujrat himachal election Assembly result 2022 what was the winning count in 2017

Assembly Elections 2022  : हिमाचल प्रदेश (Himachal pradesh) आणि गुजरात (Gujarat) या देशातील दोन महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज (गुरुवारी) हाती येणार आहेत. भाजप (BJP), काँग्रेस (Congress) की आप (aap) कोणाला मिळणारी मतं वाढणार? याचीच उत्सुकता संपूर्ण राजकीय वर्तुळात आणि मतदारांमध्येही पाहायला मिळत आहे. यंदाच्या वर्षीची आकडेवारी समोर येण्यास अजून बरेच तास आणि एक मोठी प्रक्रिया पूर्ण होणं बाकी आहे. तूर्तास 2017 च्या निवडणुकांमध्ये या दोन्ही राज्यांमध्ये नेमकं काय चित्र होतं आणि कोणत्या पक्षाचं वर्चस्व इथं पाहायला मिळालं होतं त्यावर एकदा नजर टाकायलाच हवी. (gujarat himachal election Assembly result 2022 what was the winning count in 2017)

काय होतं गुजरातमधील चित्र? 

निवडणुकांच्या मागील सत्रामध्ये गुजरातवर भाजपचा पगडा होता. भाजपनं इथं सातत्यानं पाचपेक्षा जास्त वेळेस सत्ता स्थापन केली होती. इथं भाजप विजयी उमेदवारांचं शतक पूर्ण करण्यापासून अवघ्या एका उमेदवारानं मागे राहिला होता. थोडक्यात भाजपचे 99, काँग्रेस 77 तर इतक पक्षांना 6 जागांवर विजय मिळाला होता. भाजपला गुजरातमध्ये 49.05 टक्के मतं मिळाली होती. तर 40 टक्क्यांहून काहीशी जास्त मतं काँग्रेसला मिळाली होती. 

हिमाचल प्रदेशमध्ये नेमकं काय घडलेलं? 

हिमाचल प्रदेशबाबत सांगावं तर, इथंही भाजपचीच सत्ता पाहायला मिळाली होती. भाजपच्या नावे हिमाचलमध्ये 44 तर काँग्रेसला 21 जागा मिळाल्या होत्या. इतर पक्षांना अवघ्या 3 जागांवर यश मिळालं होतं. थोडक्यात हिमाचलमध्ये भाजपकडे संख्याबळ मोठ्या फरकानं जास्त असल्याचं स्पष्ट झालं होतं. थोडं मागे जाऊन पाहिल्यास 2012 च्या तुलनेत भाजपच्या 18 आमदाराना इथं नव्यानं यश मिळालं होतं. काँग्रेस मात्र 15 जागांनी पिछाडीवर पडलं होतं. 

हेसुद्धा वाचा : गुजरातमध्ये भाजप सहाव्यांदा सत्तेवर? 

दोन्ही राज्यांमध्ये मतदान किती झालं, या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर गुजरातमध्ये 2017 ला  68.39 टक्के इतकं मतदान झालं होतं. तर, यावर्षी तेच प्रमाण 64.33 टक्क्यांवर आलं आहे. त्या तुलनेच हिमाचलमध्ये मतदानाचा आकडा सुधारताना दिसला आहे. 2017 ला हिमाचलमध्ये 75.57 इतकं मतदान झालं होतं. यंदा हाच आकडा 76 टक्क्यांवर पोहोचला आहे. ही फार मोठी उसळी नसली तरीही काही प्रमाणात मतदानाची टक्केवारी वाढणं हीसुद्धा दिलासादायक बाब ठरत आहे.