गुजरात निवडणूक : विजय रुपाणी आणि शक्ती सिंह यांच्यात टक्कर

गुजरात विधानसभेच्या निवडणूकीत पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 9, 2017, 08:29 AM IST
गुजरात निवडणूक :  विजय रुपाणी आणि शक्ती सिंह यांच्यात टक्कर  title=

अहमदाबाद : गुजरात विधानसभेच्या निवडणूकीत पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. 

कच्छ, सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधल्या १९  जिल्ह्यांत ८९  जागांसाठी आज मतदान होणार आहे. या टप्प्यात २ कोटी १२ लाख मतदार ९७७ उमेदवारांचं भवितव्य मतदानयंत्रात बंद करतील. मुख्यमंत्री विजय रुपाणी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल, काँग्रेसचे शक्तिसिंग गोहिल, परेश धनानी या दोन्ही पक्षांमधल्या मोठ्या नेत्यांच्या भवितव्याचा फैसलाही आजच निश्चित होणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे नियोजित अध्यक्ष राहुल गांधी यांनी ही निवडणुक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.

पंतप्रधानांनी केलं ट्विट 

गुजरात निवडणुकीत पहिल्या टप्प्याचं मतदान सुरू झालं आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी गुजरातच्या जनतेला मतदानासाठी बाहेर पडण्याचं ट्विटरवरुन आवाहन केल आहे. 

कांटे की टक्कर 

सर्वात मोठी टक्कर ही शनिवारी म्हणजे आज पश्चिम राजकोटमध्ये पाहायला मिळणार आहे. इथे आताचे मुख्यमंत्री विजय रुपानी जिंकून आले आहेत. त्यांना यावेळी काँग्रेसचे उमेदवार इंद्रनील राजगुरू यांच्याकडून आव्हान मिळाले आहे. तसेच ते राजकोट पूरबमध्ये आमदार आहेत. तसेच काँग्रेसचे दुसरे आमदार परेश धनानी यांना अमरेलीमध्ये काँग्रेसचे माजी नेता आणि आताचे भाजपचे आमदार टक्कर देत आहे. सौराष्ट्रमध्ये देखील आणखी मोठा मुकाबला पाहायला मिळणार आहे. कॅबिनेट मंत्री बाबूभाई बोखिरिया आणि काँग्रेसचे अर्जून मोधवाडिया आणि ऊर्जा मंत्री सौरभ पटेल हे देखील मैदानात