Gujarat Election : भाजप स्टार प्रचारकांची नावं जाहीर, चंद्रकात पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी

भाजपने (Bjp Star Campaigners) निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.   

Updated: Nov 11, 2022, 09:10 PM IST
 Gujarat Election : भाजप स्टार प्रचारकांची नावं जाहीर, चंद्रकात पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी title=

गांधीनगर : गुजरात विधानसभा निवडणुकीचं (Gujarat Election 2022) बिगूल वाजताच सर्व पक्ष तयारीला लागलेत. गुजरातमध्ये एकूण 2 टप्प्यात ही निवडणूक मतदानप्रकिया पार पडली आहे.  विविध पक्षांकडून आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. या दरम्यान भाजपने (Bjp Star Campaigners) निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासह एकूण 40 जणांच्या नावाचा समावेश आहे. (gujrat election 2022 bjp announced star campaigners name narendra modi nitin gadkari chandrakant patil)

या यादीत केंद्रातील दिग्गजांसह राज्यातील नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणजेच सीआर पाटील यांच्याही नावाचा समावेश आहे. 

निवडणुकीबाबत थोडक्यात

गुजरातमध्ये एकूण 182 जागांसाठी 2 टप्प्यात  निवडणूक होणार असल्याचं निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत जाहीर केलं. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील मतदान 1 आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान 5 डिसेंबरला पार पडणार आहे. तर 8 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे गुजरात आपला गड राखणार की सत्तांतर होणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे.    

संबंधित बातम्या 

Gujarat Elections : गुजरात निवडणुकीआधी पाकिस्तानातून आलेल्या हिंदुंबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय

Gujarat Assembly Election 2022 : 'या' पक्षाचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरला