गुजरात निवडणूक २०१७ : भाजप उमेदवार पैसे देतानाचा व्हिडिओ

गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यासाठी मतदान सुरु आहे.मात्र

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 9, 2017, 04:50 PM IST
गुजरात निवडणूक २०१७ : भाजप उमेदवार पैसे देतानाचा व्हिडिओ title=

अहमदाबाद : गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यासाठी मतदान सुरु आहे.मात्र

वलसाड जिल्ह्याच्या पारडी बैठक इथल्या भाजप उमेदवाराचा पैसे वाटप करतानाचा व्हिडीओ समोर आलाय. मतदारांना मतदान करण्यासाठी १०० रुपये वाटत असतानाचा एक कथित व्हिडीओ व्हायरल झालाय. कनु देसाई यांचा भाचा मतदारांना पैसे वाटतानाची दृष्यं कॅमे-यात कैद झालीत.

विपुल देसाई आणि हितेश देसाईसुद्धा या कथित व्हिडीओत पाहायला मिळतायत. या व्हिडीओ प्रकरणी जिल्हाधिका-यांनी चौकशीचे आदेश दिलेत. स्वतः जिल्हाधिकारी या प्रकरणी चौकशी करणार आहेत.