Gujarat Assembly Election 2022: गुजरात विधानसभा निवडणूकीचा (Gujarat Assembly Election) निकाल आता स्पष्ट झाला आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालात भाजपने 150 पेक्षा जागांवर दणदणीत मिळवला आहे. त्यामुळे आता भाजपच्या (BJP) गोटात आनंदाचं वातावरण असल्याचं पहायला मिळतंय. गुजरातमध्ये भाजपने काँग्रेसचा (Congress) 1985 चा विक्रम मोडीस काढला. अशातच आता गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी (Gujarat CM) कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
आनंदोत्सव सुरू असताना मुख्यमंत्रीपदाबाबत (Who will be the Chief Minister of Gujarat?) चर्चा सुरू होती. त्यानंतर आता भाजपने मोठी घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) पुन्हा मुख्यमंत्री होतील, असं वाटत असतानाच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील (CR Patil) यांनी मोठी घोषणा केली.
Gujarat CM will take oath at 2pm on 12th December. PM Modi and Union Home Minister Amit Shah will take part in the oath ceremony: State BJP Chief CR Patil pic.twitter.com/xEaCv7GaUo
— ANI (@ANI) December 8, 2022
गुजरातचे विद्यमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हेच पुन्हा मुख्यमंत्रीपदाची (Gujarat CM Bhupendra Patel) शपथ घेणार आहेत, यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. येत्या 12 डिसेंबर रोजी हा शपथविधी सोहळा होईल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील (CR Patil Announcement) यांनी ही माहिती दिली. त्यानंतर आता जल्लोषाचं वातावरण असल्याचं पहायला मिळतंय.
दरम्यान, हिमाचलची (Himachal Pradesh Election Results) 37 वर्षे जुनी प्रथा कायम राखल्याचं पहायला मिळालं आहे. हिमाचलमध्ये 68 पैकी 39 जागांवर आघाडी घेऊन काँग्रेस (Congress in Gujarat) निर्णायक बहुमताकडे वाटचाल करताना दिसत आहे. गुजरातमध्ये भाजपने पुर्ण ताकद लावल्याचं पहायला मिळालं होतं. बड्या नेत्यांनी जाहीर सभा देखील घेतल्या होत्या. त्यानंतर आता गुजरातचं मुकुट भाजपच्या शिरपेचात लागल्याचं पहायला मिळतंय.