नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजनीची सुरूवात झाली आहे. भाजप आणि कॉंग्रेसमध्ये अत्यंत काट्याची टक्कर असून, आघाडीचा आकडा क्षणाक्षणाला बदलत आहे. दरम्यान, कॉंग्रेसला मात्र गुजरातमध्ये अच्छे दिन दिसत आहे. कारण कॉंग्रेस आघाडीवर असून, भाजप काही अंश स्थिरावला आहे. कॉंग्रेसकडून मैदानात उतरललेले जिग्नेश मेवानी आणि अल्पेश ठाकोर सध्या चांगलेच आघाडीर आहेत.
जिग्नेश मेवानी बासकांठा जिल्ह्यातील वडगाम येथून निवडणूक लढवत आहेत. तर, अल्पेश ठाकोर राधनपुर मधून आघाडीवर आहेत. वडगाम वर सध्या कॉंग्रेसचा कब्जा आहे. मात्र, विद्यमान आमदार मणिभाई वाघेला यांनी निवडणुकल लढविण्यास निकार दिला होता. जिग्नेश मेवाणी यांना आम आदमी पक्षानेही पाठींबा दिला होता. दरम्यान, या मतदारसंघात भाजपने विजय चक्रवर्ती यांना उमेदवारी दिली आहे. मात्र जिग्नेश मेवानी यांनी कडवे आव्हान उभे केले आहे.