गुजरात निवडणूक : प्रचाराचा मॅरेथॉन धडाका, राहुल गांधींच्या 2 दिवसांत 8 सभा

काँग्रेसचे नियोजित अध्यक्ष राहुल गांधी यांच्या गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी आजपासून दोन दिवस आठ प्रचारसभा होणार आहेत.

Updated: Dec 5, 2017, 10:59 AM IST
गुजरात निवडणूक : प्रचाराचा मॅरेथॉन धडाका, राहुल गांधींच्या 2 दिवसांत 8 सभा title=

अहमदाबाद : काँग्रेसचे नियोजित अध्यक्ष राहुल गांधी यांच्या गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी आजपासून दोन दिवस आठ प्रचारसभा होणार आहेत.

अध्यक्षपधाचा अर्ज भरल्यानंर राहुल गांधी प्रथमच गुजरातमध्ये

काँग्रेस अध्यक्षपदाचा अर्ज दाखल करण्यानंतर राहुल गांधी प्रथमच गुजरातमध्ये येत आहेत. त्यामुळे नियोजित अध्यक्षांच्या भाषणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राहुल गांधींची पहिली सभा ही कच्छमध्ये होणार आहे. त्यानंतर ते सौराष्ट्रमधल्या मोर्बी, धनगाध्रा, आणि सुरेंद्रनगरमध्ये येणार आहेत. या ठिकाणी सभांसह आठ ते दहा कॉर्नर मिटिंग्सही आयोजित करण्यात आल्या आहेत.

दक्षिण गुजरातमध्येही 4 सभा

 उद्या राहुल गांधी दक्षिण गुजरातमध्ये चार सभा घेणार आहेत. नर्मदा, तापी, सुरत आणि डांग जिल्ह्यात या सभांचं आयोजन करण्यात आलंय. पहिल्या टप्प्यातील प्रचाराला अखेरचे तीन दिवस राहिले आहेत. त्यामुळं पुढच्या दिवसात जास्तीत जास्त सभा आणि रॅलींचं आयोजन काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून करण्यात येत आहे.

गुजरातमध्ये दोन टप्प्यात होणार निवडणूक

गुजरातमध्ये दोन टप्प्यांत निवडणूक पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 9 डिसेंबरला (89 विधानसभा जागा) तर, 14 डिसेंबरला (93 विधानसभा जागा ) दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडणार आहे. गुजरातसोबतच हिमाचल प्रदेशमध्येही निवडणुका होत आहेत. त्यामुळे दोन्ही राज्यांतील निवडणुकीची मतमोजनी 18 डिसेंबरला होणार आहे. गुजरात निवडणुकीसाठी 50,128 पोलिंग बूथ बनविण्यात आले आहेत. गोवा नंतर हिमाचल प्रदेश आणि गुजरात ही दोन राज्ये अशी आहेत. ज्यात व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जात आहे.