४९ वस्तुंवरील जीएसटी १२ वरून ५ टक्क्यांवर

जीएसटी काऊंसिलच्या बैठकीत तब्बल ४९ वस्तूंवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 18, 2018, 10:31 PM IST
४९ वस्तुंवरील जीएसटी १२ वरून ५ टक्क्यांवर title=

नवी दिल्ली : जीएसटी काऊंसिलच्या बैठकीत तब्बल ४९ वस्तूंवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आलाय. तर २९ हस्तकला वस्तूंवरील जीएसटी पूर्णपणे हटवण्यात आलाय. 

१२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर जीएसटी

कृषी संदर्भातल्या वस्तूंवरील जीएसटी दरही कमी करण्यात आला आहे. रियल इस्टेटला जीएसटीच्या कक्षेत आणण्यासंदर्भात सादरीकरण करण्यात आल असून यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. पेट्रोल आणि डिझेलवरील जीएसटीबाबतही निर्णय घेण्यात आलेला नाही.