मुंबई : तिसऱ्या तिमाहीत देशाच्या विकासदरात घसघशीत वाढ
2017-18 म्हणजेच चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत देशाच्या विकासदरात घसघशीत वाढ झालीय. ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यात आर्थिक विकासदराचा आकडा 7.2 %वर जाऊन पोहचला. उद्योग, सेवा आणि कृषि या आर्थिक गाड्याच्या तिन्ही प्रमुख स्तंभांमध्ये अमूलाग्र वाढ झाल्यानं भारताची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा वाढीच्या मार्गावर परतलीय.
जीएसटी लागू झाल्यावर उद्योग क्षेत्रात आलेली मरगळ आता हळूहळू कमी होत असल्यानं हा विकासदर साधल्याचं अर्थतज्ज्ञांचं मत आहे. दरम्यान वाढत्या महागाईचा विचार करता विकासदर आणि महगाईचं गणित साधण्याच्या दृष्टीनं येत्या 5 एप्रिलला जाहीर होणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक पतधोरणात व्याजाचे दर वाढण्याची शक्यताही तज्ज्ञांनी वर्तवलीयय..