मुंबई : इंटरनेटवर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कन्टेट समोर येतात. जे आपलं मनोरंजन करतात. येथे कॉमेडी, सायन्स, आर्ट, लाईफस्टाईल, कुकिंगसारख्या अनेक प्रकारचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लोक आपल्या आवडीचे कन्टेट पाहाणं पसंत करतात. परंतु ट्रेंड होत असलेले व्हिडीओ देखील लोकांसमोर येतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे, जो आश्चर्यकारक आहे. एवढंच नाही तर हा व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील चीड आल्याशिवाय राहाणार नाही.
ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये वधू-वर स्टेजवर असल्याचे दिसत आहे. परंतु तेवढ्यात असं काही घडतं, जे पाहून लोकांचा पारा वाढला आहे.
खरंतर आपल्या लग्नात सगळं काही चांगल व्हावं अशी नववधू आणि नवरदेवाची इच्छा असते. परंतु या जोडप्यासोबत काही भलतंच घडलं.
खरंतर लग्नानंतर स्टेजवर विधीप्रमाणे काही खेळ सुरु होता. या खेळात नववधू जिंकते. परंतु याचा नवरदेवाला राग येतो. ज्यामुळे तो नववधूच्या डोक्यावर जोरदार मारतो. हे पाहून काही सेकंदासाठी सगळेच शांत होतात. अगदी नववधूला देखील काय करावं हे सुचत नाही. ती काही काळ तेथेच मान खाली घालून उभी राहाते आणि मग स्टेज वरुन उतरुन निघून जाते.
Horrifying moment groom beats his new wife at their WEDDING after flipping when his bride won a game on stage during toast in Uzbekistan
The newlyweds were on-stage playing a game as their guests cheered them on
But when the bride won the game, the groom lashed pic.twitter.com/KPL0RlrjcT— MassiVeMaC (@SchengenStory) June 13, 2022
हा व्हिडीओ उज्बेकिस्तान (Uzbekistan) चा असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडीओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ''हा भयानक क्षण, गेम हरल्यानंतर वराने नववधूला जोरदार कानाखाली मारली.''
हा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड करु लागला आहे. व्हिडीओ पाहून अनेक यूजर्सनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. लोक नवरदेवाला सोडण्याचा नववधूला सल्ला देत आहेत.