Hyderabad Election Result : टीआरएसची बाजी तर एमआयएम दुसऱ्या क्रमांकावर

ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या मतमोजणीला (Hyderabad Election Result) सुरुवात झाली आहे.  

Updated: Dec 4, 2020, 03:23 PM IST
Hyderabad Election Result : टीआरएसची बाजी तर एमआयएम दुसऱ्या क्रमांकावर    title=

हैदराबाद : ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या मतमोजणीला (Hyderabad Election Result) सुरुवात झाली आहे. हैदराबादमध्ये महापालिका निवडणुकीसाठी (Hyderabad Election ) यावेळी भाजप (BJP) शड्डू ठोकून प्रचारात उतरला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अशा भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी प्रचारात रंगत आणली होती. मात्र, त्यांचा प्रभाव म्हणावा तसा पडलेला दिसून येत नाही. भाजप तिसऱ्या क्रमांकावर असून तेलंगणा राष्ट्र समितीने (TRS बाजी मारली असून एमआयएम (MIM) दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे सध्याचे चित्र आहे. निकाल हाती येण्यास वेळ लागणार आहे.

 MIMची भाजपला जोरदार टक्कर

दुपारी २.३० वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट झाले आहे. पहिल्या क्रमांकावर तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) कायम आहे. मात्र, दुसऱ्या क्रमांकासाठी भाजप आणि असदुद्दीन ओवैसी  यांच्या एआयएमआयएममध्ये जोरदार टक्कर सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. तेलंगणा राष्ट्र समितीने ६२ जागांवर आघाडी घेतली आहे. तर एआयएमआयएमने ३१ जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपला ३० जागांवर आघाडी मिळाली आहे.

हैदराबाद महानगरपालिकेच्या १३० जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. सुरूवातीच्या कलांमध्ये भाजपने सध्या ८७ जागांवर आघाडी घेतली होती. परंतु आता भाजप पिछाडीवर आहे. टीआरएसने ६५ जागांवर आघाडी घेतली आहे. दरम्यान, भाजप सध्या ४१ जागांवर तर असुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम ३२ जागांवर आघाडी घेतली होती. दुपारी २.३० वाजता भाजपला मागे टाकले आहे. भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र, त्यांना चांगली कामगिरी करता आलेली नाही.

पहिल्या कलांमध्ये भाजपची आघाडी

ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या मतमोजणीला सुरुवातीच्या पहिल्या कलांमध्ये भाजपने ८८ जागांवर आघाडी घेतली होती. टीआरएसने ३६ जागावर तर एमआयएम १७ जागांवर आघाडी घेतली होती. या निवडणुकीसाठी ७६.६७ टक्के मतदान झाले. या निवडणुकीसाठी आधी आघाडी घेणाऱ्या भाजपला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागेल, असे सध्या चित्र दिसून येत आहे. याठिकाणी भाजपचे दिग्गज उतरुनही चांगली कामगिरी करता आलेली नाही, असे चित्र सध्यातरी दिसून येत आहे.