सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी खास अॅप

सेवानिवृत्त होत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारतर्फे या मंडळींसाठी बुधवारी खास अॅप लाँच केले जाणार आहे. या अॅपमुळे कर्मचारी त्यांच्या पेंशनसंबंधित माहिती, सद्य परिस्थीती एका क्लिकवर मिळणार आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 19, 2017, 07:50 PM IST
सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी खास अॅप title=

नवी दिल्ली : सेवानिवृत्त होत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारतर्फे या मंडळींसाठी बुधवारी खास अॅप लाँच केले जाणार आहे. या अॅपमुळे कर्मचारी त्यांच्या पेंशनसंबंधित माहिती, सद्य परिस्थीती एका क्लिकवर मिळणार आहे. 

सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आपल्या पेन्शनसाठी बॅंकेत खेटा माराव्या लागतात. अनेकदा बॅंक कर्मचाऱ्यांकडूनही या सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना चांगली वागणूक मिळत नसल्याच्या तक्रारी येतात. यावर हा चांगला पर्याय ठरणार आहे. पेन्शनसंबधीत प्रकरणांचा आढावा आणि स्थिती जाणून घेणाऱे हे अॅप केंद्रीय सेवानिवृत्तांच्या दिमतीला येणार आहे. सरकारकडून पत्रक जारी करुन याबाबत माहिती देण्यात आली आहे.

काय होणार फायदे ?

सेवानिवृत्त कर्मचारी पेंशन कॅलक्युलेटरच्या माध्यमातून रिटायरमेंट फंड आणि तक्रारींची स्थिती जाणून घेऊ शकणार आहेत.
हे अॅप कर्मचाऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर वापरता येणार आहे.
तक्रार निवारणासाठी याचा विशेष फायदा होणार आहे.