पेट्रोल-डिझेल स्वस्त झालेच नाही, एका हाताने दिले एका हाताने काढून घेतले

  भडकलेल्या इंधनाच्या दरांमध्ये या अर्थसंकल्पात सवलत मिळेल, अशी सर्वसामान्यांना अपेक्षा होती. मात्र अरूण जेटलींनी ही अपेक्षा पूर्ण केलेली नाही. पेट्रोल-डिझेलवरच्या दरात एका हातानं देऊन दुसऱ्या हातानं काढून घेण्याचा प्रकार सरकारनं केलाय. 

Updated: Feb 1, 2018, 06:20 PM IST
पेट्रोल-डिझेल स्वस्त झालेच नाही, एका हाताने दिले एका हाताने काढून घेतले  title=

नवी दिल्ली :  भडकलेल्या इंधनाच्या दरांमध्ये या अर्थसंकल्पात सवलत मिळेल, अशी सर्वसामान्यांना अपेक्षा होती. मात्र अरूण जेटलींनी ही अपेक्षा पूर्ण केलेली नाही. पेट्रोल-डिझेलवरच्या दरात एका हातानं देऊन दुसऱ्या हातानं काढून घेण्याचा प्रकार सरकारनं केलाय. 

उत्पादन शुल्क 2 रुपयांनी कमी करण्यात आलं तर 6 रुपयांचं अतिरिक्त उत्पादन शुल्क रद्द करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. मात्र त्याच वेळी पेट्रोल-डिझेलवर 8 रुपयांचा रस्ते आणि पायाभूत सुविधा अधिभार लादण्यात आलाय. त्यामुळे उत्पादन शुल्क कमी झाल्यानंतरही ग्राहकांना कोणताच दिलासा मिळालेला नाही... 
 
 अर्थसंकल्पात सरकारने मोठा निर्णय घेतला होता त्यानुसार पेट्रोल-डिझेल स्वस्त झाल्याच्या बातम्या प्रसार माध्यमात प्रसिद्ध करण्यात आल्या. परंतु, अर्थसंकल्पाचा संपूर्ण अर्थ लावला असता ही आनंदाची बातमी काही क्षणाची राहिली. 

या आधारावर ठरतात पेट्रोल-डिझेलचे दर

तेल बाजारात कंपन्या तीन आधारांवर पेट्रोल-डिझेलचे दर निश्चित करतात. पहिले आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड(कच्च्या तेलाचे भाव), दुसरा देशात इम्पोर्ट करताना भारतीय रूपयाची डॉलरच्या तुलनेत किंमत, त्यानंतर तिसरे म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलचे काय दर आहेत.