आता भारतातील ट्रक पेट्रोल-डिझेलवर नाही तर, 'या' नव्या इंधनावर धावणार

Petrol Diesel : देशापुढं असणाऱ्या अनेक समस्यांपैकी एक म्हणजे वाढतं प्रदूषण आणि इंधन दरवाढ. याच समस्यांवर तोडगा काढण्यासाठी म्हणून शासनाकडून नव्या संकल्पनांवर काम सुरु आहे. 

सायली पाटील | Updated: Jun 19, 2023, 11:10 AM IST
आता भारतातील ट्रक पेट्रोल-डिझेलवर नाही तर, 'या' नव्या इंधनावर धावणार title=
Government petrol disel will replaced by LNG Corridor For Heavy Vehicles

LNG Corridor For Heavy Vehicles: देशभरात सर्वात महत्त्वाचा आणि सर्वाधिक चर्चेत असणारा मुद्दा म्हणजे इंधनाची दरवाढ. मागील काही महिन्यांमध्ये इंधनाचे दर झपाट्यानं वाढले आणि पाहता पाहता अखेर केंद्राकडूनच यावर पर्यायी वाटा सोडण्यास सुरुवात करण्यात आली. सध्याच्या घडीला देशात प्रदूषण आणि ग्रीन मोबिलिटीला वाव देण्यासाठी शासनाकडून सातत्यानं काही पावलं उचलली जात आहेत. यातलाच एक निर्णय म्हणजे येत्या काळातील प्रस्ताविक LNG वापर. 

Gas वर चालणारी दळणवळणाची सुविधा तयार करून ती वापरात आणण्याचा मानस केंद्रानं दृष्टीक्षेपात ठेवला असून, अवजड वाहनांसाठी LNG चा वापर केला जाऊ शकतो. ज्यामुळं ही वाहनं पेट्रोल आणि डिझेल यांसारख्या इंधनांवर तुलनेनं कमी अवलंबून राहतील. सध्याच्या घडीला याच हेतूनं केंद्राकडून अवजड वाहनांसाठी एलएनजीचा वापर केला जाण्यावर आणि तो वाढवण्यावर भर असल्याचं पाहायला मिळत आहे. 

कोणत्या वाहनांसाठी होणार LNG चा वापर? 

सध्या केंद्राकडून एलएनजी कॉरिडोअरवर काम केलं जात असून, येत्या काळात ऑटो कंपन्यांना LNG वर आधारित वाहननिर्मितीवर भर देण्याची विचारणा केली जाऊ शकते. ज्यामुळं हा पेट्रोल आणि डिझेल या इंधनांसाठी एक चांगला पर्याय सिद्ध होऊ शकतो. सदरील प्रस्तावावर शासनाकडून Stake Holders, पेट्रोलियम आणि अवजड उद्योग मंत्रालय यांच्यासोबत चर्चा सुरु असल्याची माहिती मिळत आहे. 

हेसुद्धा पाहा : गॅस सिलिंडरही Expire होतो; जाणून घ्या त्यावर असणाऱ्या प्रत्येक आकड्याचा अर्थ 

पर्यावरण संरक्षणाच्या हेतूनं हे सरकारनं उचललेलं एक मोठं आणि तितकंच महत्त्वाचं पाऊल ठरत आहे. जिथं गुंतवणूकदारांनाही मोठी संधी मिळू शकते. ज्यामुळं येत्या काळात खासगी क्षेत्रामध्ये एलएसजी कॉरिओडर सुरु होईल. येत्या काही महिन्यांमध्ये ही योजना पूर्णपणे अंमलात आणली जाईल. 

पेट्रोल आणि  डिझेलच्या वापरावर परिणाम 

येत्या काळात पेट्रोल आणि डिझेलचा वापर आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या वाहनांचं प्रमाण कमी करण्याच्या हेतूनं सध्या सरकार काम करताना दिसत आहे. शिवाय एलएनजीच्या दरांमध्येही फार तफावत नसावी, सोबतच नियंत्रकाडे नफ्याची नोंद राहील या विविध निकषांवर काम सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. थोडक्यात देश इंधन क्षेत्रात एक नवा प्रयोग करू पाहत असून, तो कितपत यशस्वी ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.