भारतीय सैन्यात 'या' पदासाठी नोकरीची संधी

उमेदवार 16 ऑगस्ट 2020 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात.

Updated: Jul 21, 2020, 05:11 PM IST
भारतीय सैन्यात 'या' पदासाठी नोकरीची संधी title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : भारतीय सैन्यात Indian Army नोकरी करण्याची संधी मिळू शकते. सैन्यात एसएससी ऑफिसर्स-आर्म्ड फोर्स मेडिकल सर्व्हिससाठी SSC Officers- Armed Forces Medical Services भरती सुरु झाली आहे. या सरकारी नोकरीसाठी आवश्यक पात्रता असल्यास उमेदवार 16 ऑगस्ट 2020 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात.

पद - SSC Officers- Armed Forces Medical Services
रिक्त जागा - 300 (पुरुष 270 आणि महिला 30)
पात्रता - एमबीबीएस, पोस्ट ग्रॅज्युएट/ डिप्लोमा
वयोमर्यादा - 45 वर्षे 
वेतन - 97000 रुपये प्रति महिना

या रिक्त जागांसाठी सर्व वर्गातील उमेदवारांना 200 रुपये ऍप्लिकेशन फी भरावी लागणार आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे फी भरता येणार आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिख 16 ऑगस्ट 2020 आहे. तर मुलाखतीसाठीची संभाव्य तारिख 31 ऑगस्ट 2020 असू शकते.

ठाणे महापालिकेत मोठी भरती, ४० हजारांपर्यंत पगार

www.amcsscentry.gov.in या लिंकवरुन उमेदवार रिक्त पदासाठी अर्ज  करु शकतात. मुलाखतीच्याआधारे उमेदवाराची निवड केली जाणार आहे. मुलाखतीसाठीचं ठिकाण दिल्ली असून नोकरीसाठी भारतातील कुठलेही ठिकाण असू शकते.  

N-95 मास्क वापरताय? तर हे एकदा वाचाच...