नवी दिल्ली : दोशात कोरोना व्हायरसचा वाढता कहर पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडऊन पुढे ढकलला आहे. त्यामुळे गरीब जनतेला मात्र अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी केंद्र सरकारने गरिबांवरचे संकट दूर करण्यासाठी त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास सुरूवात केली आहे. आर्थिक सहायता योजनेच्या माध्यमातून सरकार गरिबांच्या खात्यात पैसे जमा करत आहे. लॉकडाऊनच्या काळात सरकार दुसऱ्यांदा सोमवारी जनधन खात्याद्वारे गरिबांच्या खात्यात ५०० रूपये टाकणार आहे.
त्यामुळे खातेधारक पैसे काढण्यासाठी बँकेबाहेर गर्दी करतील. अशात सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा उडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवाय कोरोनाचा संसर्ग देखील वाढण्याची भीती नाकारता नाही. त्यामुळे सरकारने खात्यातून पैसे काढण्यासाठी काही अटी आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन खाते धारकांना केले आहेत.
यंदा बँक खात्याच्या शेवटच्या आकड्यानुसार पैसे देण्यात येणार आहेत. बँक खात्याच्या शेवटच्या आकड्यानुसार दिवस ठरवून देण्यात आले आहेत. त्याच खाते धारकांना ठरवून दिलेल्या दिवशी पैसे काढता येतील.
ज्या खातेधारकांच्या खात्याचा शेवटचा आकडा ०-१ असा असेल त्यांना ४ मे रोजी खात्यातून पैसे काढता येतील.
ज्या खातेधारकांच्या खात्याचा शेवटचा आकडा २-३ असा असेल त्यांना ५ मे रोजी खात्यातून पैसे काढता येतील.
ज्या खातेधारकांच्या खात्याचा शेवटचा आकडा ४-५ असा असेल त्यांना ६ मे रोजी खात्यातून पैसे काढता येतील.
ज्या खातेधारकांच्या खात्याचा शेवटचा आकडा ६-७ असा असेल त्यांना ८ मे रोजी खात्यातून पैसे काढता येतील.
ज्या खातेधारकांच्या खात्याचा शेवटचा आकडा ८-९ असा असेल त्यांना ११ मे रोजी खात्यातून पैसे काढता येतील.
एप्रिलमध्ये जेव्हा सरकारने जनधन खातेधारकांच्या खात्यात पैसे टाकले होते, तेव्हा महिलांनी बँके बाहेर एकच गर्दी केली. त्यामुळे परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत यंदा पैसे काढण्याच्या प्रक्रियेत काही बदल करण्यात आले आहेत.