India first space tourist : पृथ्वीपासून कैक मैल दूर असणाऱ्या किंबहुना या पृथ्वीच्या परिघाबाहेर असणाऱ्या विश्वाबद्दल कायमच अनेकांना कुतूहल वाटतं. मुळात या अंतराळाविषयीच्या अनेक प्रश्नांची उकल झाली असली तरीही तिथं आपण जाऊ शकतो का? असा प्रश्न कायमच सामान्यांना पडतो आणि याचं उत्तर आहे, हो.
भारतासाठी अतिशय महत्त्वाचा असणारा क्षण नुकताच अनेकांनी अनुभवला, कारण पहिल्यांदाच एका सर्वासामान्य नागरिकानं अंतराळात फेरफटका मारून पुन्हा पृथ्वीवर पाऊल ठेवलं. भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांनी 1984 मध्ये त्यांच्या यशस्वी मोहिमेनंतर पृथ्वीवर पाऊल ठेवण्याच्या या घटनेनंतर आता गोपीचंद हे सामन्य नागरिक म्हणून अंतराळात फेरफटका मारून येणारी पहिले भारतीय ठरले आहेत.
उपलब्ध माहितीनुसार गोपीचंद यांनी अॅनेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांच्या ब्लू ओरिजिन या अंतराळ संस्थेच्या न्यू शेफर्ड- 25 मोहिमेसाठी चालक दलात सहभाग घेतला होता. मे महिन्यात गोपीचंद थोटाकुरा यांनी पृथ्वीच्या कारमन रेषेबाहेरील क्षेत्रामध्ये प्रवेश केला होता. ही आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त सीमा असून, पृथ्वीपासून तिचं अंतर 100 किमींवर आहे.
ब्लू शेपर्ड ओरिजिनच्या या मोहिमेतील तिकीट दराविषयी अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण, सूत्रांच्या माहितीनुसार सुरुवातीलाच ज्यांनी अंतराळयात्रेसाठी रुची दाखवली होती त्यांना साधारण 28 मिलियन डॉलर अर्थात 23,49,15,24 रुपये इतका खर्च येतो पण, हे दर पाहता प्रवास अनेकांसाठी उपलब्ध करून देण्याच्या हेतूनं हे दर साधारण 6,29,15,610 ते 8,22,90,000 पर्यंत हे दर कमी करण्यात आले आहेत असं कळत आहे.
भारताच्या वतीनं गोपीचंदची या मोहिमेसाठी निवड झाली आणि या मोहिमेसाठी आपल्याला संधी मिळणं ही मोठी बाब असल्याची प्रतिक्रिया त्यानं दिली. सदर मोहिमेत सहभागी झालेल्यांना पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाण्याची आणि किमान गुरुत्वाकर्षणात तग धरण्याची संधी आणि एक अद्वितीय अनुभव मिळाला. येत्या काळात अंतराळ भ्रमंतीच्या या क्षेत्राचा नेमका किती आणि कसा विकास होतो यातून अनेक गोष्टी साध्य होणार आहेत असं म्हणायला हरकत नाही.