मुंबई : आता सगळेच लोक ऑनलाईन पेमेंटच्या पर्यायांकडे वळले आहेत. त्यामुळे सगळेच लोक पैसे ट्रान्सफर करण्यासाठी गुगल पे किंवा पेटीएम सारख्या पर्यायांकडे वळले आहेत. त्यामुळे रोख पेमेंटला कमी प्राधान्य लोकांकडून दिले जात आहे. यामुळे आपण कुठल्याही वेळी, कुठेही पैसे भरु शकतो. यामुळे आपला वेळ देखील वाचतो. तुमच्यापैकी देखील अनेक लोक Google Pay द्वारे पैसे भरत आहेत. परंतु तुम्हाला याबद्दल काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे.
Google Pay नवीन नियम आणत आहे. Google Pay ने 1 जानेवारीपासून नवीन नियम लागू केले आहे. याचा परिणाम Google Pay वापरकर्त्यांवरही होऊ शकतो. लक्षात ठेवा की 1 जानेवारी 2022 पासून, Google Pay आता कार्ड क्रमांक आणि त्यांची एक्पायरीडेट यासारखे आता जतन करणार नाही.
याचा अर्थ असा की तुमच्या कार्डची माहिती गुगलपे आता वापरणार नाही किंवा साठवून ठेवणार नाही. Google Pay ला देखील देशाच्या मध्यवर्ती बँक, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या नियमांचे पालन करावे लागेल. मासिक सबस्क्रिप्शन पेमेंटसाठी ज्यांनी Google Pay वर कार्ड तपशील सेव्ह केले आहेत त्यांना या नवीन नियमाची माहिती असावी.
आरबीआयच्या नियमानुसार कार्ड जारी करणाऱ्या आणि कार्ड नेटवर्क कंपन्या वगळता इतर कंपन्यांनी ग्राहकांचे कार्ड तपशील साठवू नयेत. म्हणजेच कार्डशी रिलेटेड कोणतीही माहिती कंपनी त्यांच्या पोर्टलवरती सेव्ह करु शकत नाही.
त्यामुळे जर यापूर्वी तुम्ही कोणत्याही ऑनलाईन साईट किंवा कुठेही तुमचे कार्ड डिटेल सेव्ह करुन ठेवले असेल, तर ते डिलीट करावे.