नवी दिल्ली : जर आपणास फिरण्याची आवड असेल आणि जर आपण बजेट पाहून अंतिम निर्णय घेऊ शकत नसाल तर एसबीआयच्या हॉलिडे सेव्हिंग अकाउंट आपल्या बजेटमध्ये योग्य ठरणार आहे. होय, या टूर पॅकेजचे नियोजन थॉमस कुक करणार आहे. एसबीआयच्या हॉलिडे सेव्हिंग अकाउंटच्या मदतीने तुम्ही एखाद्या टूरचे नियोजन करु शकता. त्यामुळे तुमच्या बजेटवर याचा परिणाम होणार नाही. त्यासाठी नियमित बचत आधीपासून केली जाणार आहे, म्हणून ही योजना आपल्या बजेटवर परिणाम करणार नाही.
एसबीआय आणि थॉमस कुक यांनी असे हॉलिडे पॅकेज तयार केले आहे. ज्याद्वारे तुम्ही आपल्या हॉलिडेच्या आधी तुम्ही बचत करु शकता. ज्याद्वारे आपण सुट्टीसाठी आगाऊ बचत करू शकता. या योजनेअंतर्गत, आपल्याला थॉमस कुकच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. तेथे एसबीआय हॉलिडे सेव्हिंग अकाउंटसाठी एक्सक्लूसिव्ह पॅकेज निवडणे आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला बँकेच्या आवर्ती ठेवीनुसार या पॅकेजसाठी प्रत्येक महिन्यात बचत करणे सुरू करावे लागेल.
- थॉमस कुक एचएसएच्या वेबसाइटला भेट द्या आणि आपल्या निवडीचे एक पॅकेज निवडा.
- आपण निवडलेल्या पॅकेजची एकूण रक्कम 13 हप्त्यात विभागली जाईल आणि आपल्याला पुढील एका वर्षात ई-आरडीद्वारे एसबीआय खात्यात 13 पैकी केवळ 12 महिने पैसे भरावे लागतील.
- या ई-आरडीवर आपल्याला व्याज देखील मिळेल.
- मुदतपूर्तीच्या वेळी, ही रक्कम थॉमस कुकच्या खात्यात हस्तांतरित केली जाईल. पॅकेज 13 भागांमध्ये विभागले गेले आणि आपल्याकडे केवळ 12 हप्त्येच द्यावे लागती.
आपण निवडलेल्या पॅकेजनुसार, आपल्याला त्याप्रमाणे पैसे द्यावे लागतील. एसबीआयच्या वेबसाईटनुसार, फक्त 900 रुपये प्रति महिना 12 हप्त्यात देऊन थॉमस कुककडून सुट्टीचे पॅकेज मिळवू शकता. जर काही कारणास्तव या ई-आरडीची संपूर्ण हप्ते तुम्ही भरु शकत नसाल, तर कालावधी संपल्यावर रक्कम तुमच्या खात्यात जमा केली जाईल. आपणास कोणतेही नुकसान होणार नाही. फक्त एवढेच नव्हे तर, आपल्याला अचानक पैशांची गरज असेल तर आपण ई-आरडीची परतफेड करून या पैशाचा वापर करू शकता. आपण एसबीआयचे हॉलिडे बचत खाते उघडल्यास आपल्याला फिसण्यास जाणे आवश्यक आहे. तसेच आपल्या गरजेनुसार आपण आपली योजना बदलू शकता.