वर्षअखेरीस होणाऱ्या पार्टीपेक्षाही परवडेल पेट्रोलचा खर्च

पाहा काय आहे दर 

वर्षअखेरीस होणाऱ्या पार्टीपेक्षाही परवडेल पेट्रोलचा खर्च title=

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी अगदी वर्षअखेरीस सामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. नवीन वर्षात ग्राहकांना दिलासा देणारे पेट्रोल आणि डिझेलचे दर पाहायला मिळतात. वर्ष सरता 2018 ने पेट्रोल, डिझेलच्या दराचा निच्चांक गाठला आहे. 

सोमवारी दिल्लीत पेट्रोलची किंमत 20 पैसे प्रती लीटर दराने कमी नोंदवली गेली आहे. यामुळे आता पेट्रोलचा दर 68.84 रुपये प्रती लीटर आहे. 

तिथेच डिझेलचा दर देखील सोमवारी 23 पैशांनी कमी झाला असून त्याची किंमत 62.86 रुपये प्रती लीटर नोंदवली गेली आहे. वर्षअखेरीस पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील हा सर्वात कमी दर नोंदवला गेला आहे. 

मुंबईत सोमवारी पेट्रोलचा दर 20 पैसे प्रती लीटरने कमी झाला असून आता पेट्रोलची किंमत 74.47 रुपये प्रती लीटर आहे. तर मुंबईत डिझेलची किंमत 25 पैशांनी कमी झाली असून 65.76 रुपये प्रती लीटर नोंदवली आहे. 

मुंबईत रविवारी पेट्रोलची किंमत 22 पैशांनी घसरून 74.67 रुपये आणि डिझेलची किंमत 24 पैशांनी घसरून 66.01 रुपये प्रती लीटर झाली. तर कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत 22 पैशांनी कमी होऊन आता 71.15 रुपये तर डिझेलची किंमत 23 पैशांनी कमी होऊन 64.84 रुपये प्रती लीटर झाली आहे. 

गुरूवारी कच्चा तेलात जवळपास 4.5 टक्के जोरदार घसरण पाहायला मिळाली. योग्य क्रूड तेलावर 52 डॉलरपर्यंत घसरण पाहायला मिळाली. मात्र शुक्रवारी तेलाच्या किंमतीत थोडी उचलही पाहायला मिळाली. मात्र कच्चा तेल्याच्या घसरणीमुळे ग्राहकांना फायदा होत आहे. 

येणाऱ्या दिवसांत आणखी कमी होणार दर

भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दर हे पूर्णपणे आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलावर याची मागणी आणि पुरवठा अवलंबून असतो. 

मिळालेल्या माहितीनुसार कच्चा तेलाची मागणी कमी झाली असून त्याचं उत्पादन अधिक झाल्यामुळे कच्चा तेलाची किंमत कमी झाली आहे. त्यामुळे आशा आहे की, येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलची किंमत दोन ते तीन रुपयांनी कमी होईल.