नवी दिल्ली : सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुमचे स्वप्नपूर्ण करण्यासाठी सुवर्ण संधी आहे. सध्या एसबीआय बँकेत अनेक पदासाठी भर्ती प्रक्रिया सुरू आहे. जर तुम्ही एसबीआयमध्ये नोकरी करू इच्छीत असाल तर लगेच एसबीआय बँकेच्या पोर्टलद्वारे नोकरीसाठी अर्ज भरू शकता. एसबीआय अनेक महत्त्वाच्या पदांसाठी भर्ती प्रक्रिया सुरू केली आहे. ८ ऑक्टोबर २०२० पर्यंत तुम्हाला नोकरीसाठी अर्ज भरता येणार आहे. यासाठी कोणत्याही प्रकारची पूर्व परीक्षा घेतली जाणार नाही.
या पदांसाठी भर्ती सुरू
पद भर्ती
डिप्टी मॅनेजर सिक्योरिटी २८
मॅनेजर (रिटेल प्रोडक्ट्स) ०५
डाटा ट्रेनर ०१
डाटा ट्रान्सलेटर ०१
सीनियर कंसल्टेंट एनालिस्ट ०१
AGM (एंटरप्राइज एण्ड टेक्नोलॉजी आर्किटेक्चर) ०१
डाटा प्रोटेक्शन ऑफिसर ०१
डिप्टी मॅनेजर (डाटा साइंटिस्ट) ११
मॅनेजर (डाटा साइंटिस्ट) ११
डिप्टी मॅनेजर (सिस्टम ऑफिसर) ०५
रिस्क स्पेशलिस्ट- सेक्टर (स्केल-III) ०५
रिस्क स्पेशलिस्ट- सेक्टर (स्केल-II) ०५
पोर्टफोलियो मॅनेजमेंट स्पेशलिस्ट (स्केल-II) ०३
रिस्क स्पेशलिस्ट-क्रेडिट (स्केल-III) ०२
रिस्क स्पेशलिस्ट- क्रेडिट (स्केल-II) ०२
रिस्क स्पेशलिस्ट- एंटरप्राइज (स्केल-II) ०१
रिस्क स्पेशलिस्ट- IND AS (स्केल-III) ०४
कसा भराल अर्ज
- सर्व प्रथम तुम्हाला https://bank.sbi/web/careers या वेबसाइटवर क्लिक करा.
- करियर लिंकवर क्लिक करा.
- लेटेस्ट अनाउंसमेंट सेक्शनमध्ये जावून एडव्हर्टिजमेंटवर क्लिक करा ज्यासाठी तुम्ही अर्ज भरू इच्छीता.
- त्यानंतर अप्लाय ऑनलाईन क्लिक करा किंवा न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करा.
- रजिस्ट्रेशन केलं असेल तर लॉग-इनवर क्लिक करा.
- त्यानंतर स्वतःची संपूर्ण माहिती भरून अर्ज सबमीट करा.
शुल्क किती असेल
एसबीआयमध्ये या पदांसाठी तुम्हाला ८ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. शिवाय जनरल, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी उमेदवारांसाठी ७५० शुल्क आकारले जाईल. अनुसूचित जाती / जमाती / पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही. शुक्ल डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड / इंटरनेट बँकिंगद्वारे ऑनलाईन भरू शकता. उमेदवारांना सर्व आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावी लागतील.