Gold Silver Rate | सुवर्ण झळाळी वाढली; चांदीच्या किंमतीतही वाढ

Gold Silver Price Today: सोने चांदीच्या किंमतीमध्ये आज मोठी तेजी नोंदवली गेली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर प्रति तोळे 450 रुपयांच्या वर गेले होते. चांदीच्या दरातही वाढ नोंदवली गेली.

Updated: Apr 11, 2022, 03:25 PM IST
Gold Silver Rate | सुवर्ण झळाळी वाढली; चांदीच्या किंमतीतही वाढ title=

मुंबई : Gold Silver Price Today: सोने चांदीच्या किंमतीमध्ये आज मोठी तेजी नोंदवली गेली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर प्रति तोळे 450 रुपयांच्या वर गेले होते. चांदीच्या दरातही वाढ नोंदवली गेली.

सोमवारी सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ नोंदवली गेली असून गेल्या अनेक दिवसांपासून घसरण होणाऱ्या सोन्याच्या दरांमध्ये आज तेजी नोंदवली गेली. दुपारी 3 वाजेपर्यंत MCX वर सोन्याचे दर 450 रुपये प्रति तोळेंनी वाढून 52516 रुपये प्रति तोळे इतके होते. तर चांदीची किंमत  655 रुपये प्रति किलो वाढून 67647 रुपये इतके झाले होते.

मुंबईती सोन्याचे दरांमध्येही तेजी नोंदवली गेली. आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचे दर  54150 रुपये प्रति तोळे इतके होते. तर चांदीचे दर 69000 रुपये प्रति किलो इतके होते. 

येत्या काही दिवसात लग्न समारंभाचे मुहूर्त आहेत. तसेच अक्षय तृतीया देखील आहे. त्यामुळे ग्राहकांचा सोने खरेदीकडे कल वाढला आहे. सोन्याचे सध्या भाव वाढलेले असले तरी उच्चांकी दरापेक्षा 3 ते 4 हजार रुपये प्रति तोळेंनी स्वस्त मिळत आहे.