मुंबई : सोन्याच्या किंमतींमध्ये नेहमीच चढ उतार होत असतो. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये होणाऱ्य़ा बदलाचाही परिणाम देशातील सोन्याच्या बाजारात होत असतो. देशात सणासुदीच्या दिवसांमध्ये तसेच लग्नसराईमध्ये सोन्याला मागणी असल्याने सोन्याच्या किंमतींमध्ये चढ-उतार होत असते.
आज सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये व्यवहार सुरू होताच सोन्याच्या किंमतींमध्ये कालपेक्षा घसरण दिसून आली. दुपारी 1 वाजेपर्यंत पुन्हा सोन्याचे भाव सावरताना दिसत आहे. दुपारी MCXवर सोन्याचे भाव 47848 रुपये प्रति तोळे (+550) इतके होते. तर चांदीचे भाव 62750 रुपये प्रति किलो इतके होते.
सोन्याच्या दरांमध्ये काही दिवसांपूर्वी मोठी घसरण झाली होती. त्यानंतर दररोज काही किरकोळ घसरण नोंदवली जात आहे. मुंबईतील सोने - चांदीची गेल्या काही दिवसांचे भाव पाहिल्यास आपल्या लक्षात येते.
मुंबईतील सोन्याचे दर
26 नोव्हेंबर | 47,630 रुपये प्रति तोळे
25 नोव्हेंबर | 47,630 रुपये प्रति तोळे
24 नोव्हेंबर | 47,630 रुपये प्रति तोळे
23 नोव्हेंबर | 47,990 रुपये प्रति तोळे
22 नोव्हेंबर | 49,280 रुपये प्रति तोळे
मुंबईतील चांदीचे दर
26 नोव्हेंबर | 63100 प्रति किलो
25 नोव्हेंबर | 62900 प्रति किलो
24 नोव्हेंबर | 62700 प्रति किलो
23 नोव्हेंबर | 64000 प्रति किलो
22 नोव्हेंबर | 65600 प्रति किलो
सोन्याच्या किमतीत सध्या विक्रमी उच्चांकापेक्षा खूपच स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये MCX वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली होती.
त्यामुळे ऑगस्ट 2020 च्या सोन्याच्या दरांच्या तुलनेत आजही सोने 7 ते 8 हजाराने स्वस्त मिळत आहे. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांना सोने - चांदीत गुंतवणूक करण्याची चांगली संधी आहे.