सोने-चांदीच्या दरात बदल, हा आहे आजचा दर

आजच्या दरात झाला मोठा बदल 

Updated: Sep 14, 2020, 02:16 PM IST
सोने-चांदीच्या दरात बदल, हा आहे आजचा दर  title=

मुंबई : सोने-चांदीच्या दरात आज घसरण पाहायला मिळत आहे. आज सकाळी देशभरातील सराफ बाजारा सोने-चांदीच्या दरातील घसरणाने उघडला. सोमवारी शुक्रवारच्या तुलनेत २४ कॅरेट सोन्याच्या दरात थोडी घसरण पाहायला मिळाली. सोन्याचा आजचा दर ५५ रुपये प्रति १० ग्रॅमने स्वस्त होऊन ५१,३८६ रुपये एवढा आहे. तर २३ कॅरेट सोन्यचा दर हा ५१,१८० रुपये तर २२ कॅरेट सोन्याचा दर हा ४७,०७० रुपये आहे. १८ कॅरेटच्या सोन्याचा दर ३८,५४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर चांदीचा दर १९८ रुपयांनी कमी झाला आहे. आज चांदीचा दर ६५,२२६ रुपये प्रति किलोग्रॅम इतकं आहे. 

इंडियन बुलियन ऍण्ड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटच्या माहितीनुसार असा आहे आजचा सोन्या-चांदीचा दर. आमच्या सहयोगी zeebiz.comच्या मते सोने किंमतीत  (Gold Price) घसरण झाल्यावर गुंतवणूक करणे चांगले असते.  आपल्याला येत्या काही दिवसांत चांगले उत्पन्न मिळू शकेल. सोन्याच्या भावात वरच्या स्तरापासून दहा टक्क्यांपर्यंत घट दिसून आली आहे. सोन्यातील अशा गुंतवणूकीत तुम्हाला चांगले उत्पन्न मिळेल.

सोने दर ६० हजारांच्या घरात जाऊ शकतो 

सराफा मार्केटमधील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार दिवाळीपर्यंत सोन्याचे दर वाढू शकतो. तो १० ग्रॅमला ६० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. सोने खरेदी करण्याव्यतिरिक्त, त्याच्या करांच्या नियमांची माहिती महत्त्वपूर्ण आहे. सोने खरेदीसाठी कर भरावा लागतो. परंतु फारच कमी लोकांना माहिती आहे की सोने विक्रीवरही कर भरावा लागतो.