५२ हजाराच्या पार गेला सोने-चांदीचा भाव

वैश्विक बाजारात देखील तेजीने वाढ

Updated: Jul 27, 2020, 04:22 PM IST
५२ हजाराच्या पार गेला सोने-चांदीचा भाव  title=

मुंबई : कोरोनाच्या काळात सोने-चांदीच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सोन्याच्या किंमतीत वाढ झाली असून ५२ हजारांच्या पार गेली आहे. सोन्या-चांदीच्या दरात वाढ गोत आहे. सोमवारी चांदीचा दर हा ६४,६०० रुपये प्रति किलो आहे. तर सोन्याच्या किंमतीने नवीन रेकॉर्ड बनवले आहेत. वैश्विक बाजारात देखील तेजीने वाढ होत आहे. 

५२ हजार झाले सोन्याचे दर 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा बदल पाहायला मिळाली. शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या दरात ४७५ रुपयांनी वाढ झाली असून आताचा दर हा ५१,९४६ रुपये इतका १० ग्रॅम आहे. गेल्या काही आठवड्यात सोन्याचा दर ५१,४७१ प्रति १० ग्रॅम आहे. 

चांदीने आठ वर्षांनंतर हा उच्चांक गाठला आहे. गेल्या आठवड्यापेक्षा आता सोन्याच्या दरात चार टक्के वाढ झाली आहे तर चांदीच्या दरात १५ टक्के वाढ झाली आहे. MUlti Commodity Exchange मध्ये ऑगस्टपर्यंत सोन्याच्या किंमतीत १.५ टक्के म्हणजे ८०० रुपयाने वाढ झाली असून आता किंमत ५१,८३३ रुपये प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर आहे. 

सराफा बाजारामध्ये आणि आंतरराराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोने आणि चांदीच्या दरांमध्ये होणाऱ्या हालचाली पाहता येत्या काही दिवसांमध्ये हे दर पुन्हा एकदा विक्रमी आकड्यानं वाढतील असा अंदाज अभ्यासकांनी वर्तवला आहे.