Gold Price Today : शुक्रवारी सोन्याचा दर झाला कमी, खरेदी करण्याची मोठी संधी

आज, शुक्रवारी 6 डिसेंबरला सोन्याचा दर काय? आज तुमच्या शहरात काय आहे सोने आणि चांदीचा दर? 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 6, 2024, 12:32 PM IST
Gold Price Today : शुक्रवारी सोन्याचा दर झाला कमी, खरेदी करण्याची मोठी संधी title=

सोने आणि चांदीच्या दरात सतत चढ-उतार पाहायला मिळतो. इंटरनॅशनल मार्केटमध्ये मोठे बदल होताना दिसत आहे. आज 6 डिसेंबर रोजी सोना, चांदीचा दरात मोठा बदल झालेला दिसतो. गुरुवारच्या तुलनेत आज सोने, चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 

सोने चांदीचा दर 
24 कॅरेट सोन्याच्या दर भारतात 76380 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 1 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 7638 रुपये इतका आहे. 22 कॅरेट 10 ग्रॅम  सोन्याचा दर 70015 रुपये इतका आहे. 

गेल्या आठवड्यात 24 कॅरेट सोन्याचा दर 0.3 टक्के घसरला आहे. गेल्या 10 दिवसांमध्ये सोन्याच्या दरात 2.1 टक्के वाढ झाली आहे. तर भारतीय ग्राहकांचा चांदीचा दर 92060 रुपये प्रति किलो असा आहे. 

सोन्याचा भाव 
मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचा दर 76380 प्रति 10 ग्रॅम आहे. 5 डिसेंबरला सोन्याचा दर 77040 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर गेल्या आठवड्यात 29 नोव्हेंबर रोजी ,सोने 76660 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 

चांदीचा भाव 
मुंबईत आज चांदीचा दर 92060 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. चांदीचा दर 93030 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. एका आठवड्यात चांदीचा 89240 रुपये प्रति ट्रेड आहे. 

प्रति ग्रॅम सोन्याची किरकोळ किंमत काय आहे?

प्रति ग्रॅम सोन्याची किरकोळ किंमत ग्राहक एका ग्रॅम सोन्यासाठी देय रक्कम प्रतिबिंबित करते, सामान्यत: भारतीय रुपयामध्ये उद्धृत केली जाते. जागतिक आर्थिक ट्रेंड, भू-राजकीय घटना आणि पुरवठा आणि मागणी यांच्या परस्परसंवादामुळे हा दर दररोज चढ-उतार होतो.

सोन्याची किंमत भारतातील कोणत्या घटकांवर अवलंबून असते?

भारतात, आयात शुल्क, कर आणि चलन विनिमय चढउतार यांसारख्या घटकांसह आंतरराष्ट्रीय सोन्याच्या बाजारातील दरांवर किंमतीचा प्रभाव पडतो.