Gold-Silver Price Today: आज पुन्हा एकदा सोनं-चांदीच्या दरात घट झाल्याचे पाहायला मिळतंय. सोमवारी 2 सप्टेंबर रोजीदेखील सोन्याच्या दरात घट झाली होती. ऐन गणेशोत्सवाच्या आधीच सोन्याच्या दरात घट झाल्याने ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला होता. कमोडिटी एक्सचेंजवर सोनं-चांदीच्या दरात सुस्ती असताचा सराफा बाजारातही सोन्याचे दर कोसळले आहेत. आज MCXवर मौल्यवान धातूंच्या किंमती प्रतितोळा 71474 रुपयांवर स्थिरावले आहे. तर, चांदीच्या किंमतीत 250 रुपयांनी घसरून 84,258 वर ट्रेड करत आहे.
सणासुदीच्या दिवसांतच सोन्याच्या दरात घट झाल्याने आता मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, मागणी वाढल्यानंतर सोन्याच्या दरातही वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 2 सप्टेंबर रोजी MCXवर शेवटच्या सत्रात सोनं 71601 रुपये प्रति 10 ग्रॅमवर स्थिरावले होते. तर, फ्युचर डिलिव्हरी असलेले सोनं 72,071 रुपये प्रति 10 ग्रॅमवर स्थिरावले होते.
आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील सोन्याचे दर कमकुवत असल्याचे जाणवले होते. सोमवारी यात 0.2 टक्क्यांनी घसरून 2400 डॉलरपर्यंत पोहोचले होते. स्पॉट गोल्ड $2,494.19 प्रति औंसच्या लेव्हलवर होते. गोल्ड फ्युचरमध्ये 0.1 टक्क्यांची घट असून नंतर $2,526.10 प्रति औंसवर स्थिरावले होते.
22 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याचे दर- 6669
24 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याचा दर - 7276
22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर- 66,700
24 कॅरट 10 ग्रॅम सोन्याचा दर- 72,770