Gold-Silver Price on 13 April 2023 : सोन्याच्या (gold rate) दराने पुन्हा एकदा नवा उच्चांक गाठला आहे. त्यामुळे सोने कशी चांगली गुंतवणूक आहे, यावर पुन्हा एकदा चर्चा रंगू लागल्या आहेत. सोन्यात आता पैसे गुंतवायचे की नाहीत, अशी विचारणा सुरु झाली. सोन्याची खरेदी ही दागिने घडविण्यासाठी, खरेदी गुंतवणूक म्हणून आणि तिसरी सट्टेबाजीसाठी केली जाते. त्यामुळे प्रत्येकजण हा सोन्याच्या दरावर लक्ष ठेवून असतात. आज (13 एप्रिल 2023) सोने-चांदीचे (gold silver price) दर जाहिर झाले असून सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे तर चांदीचे दर स्थिर आहेत.
आज 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 56,210 रुपये असून तर चांदी 77,350 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग चार्जेसमुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती संपूर्ण भारतात बदलतात. तर मुंबईत प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 56,210 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 61,320 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात तेच दर 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 56,210 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 61,320 रुपये असेल. आहे. नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 56,210 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 61,320 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 56,240 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 61,350 रुपये आहे. तर चांदीचा आजचा प्रति 10 ग्रॅमचा दर 773.50 रुपये आहे.
वाचा : आज तुम्ही पेट्रोल-डिझेल भरायला जाणार आहात का?
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. त्यानंतर लगेचच एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील.
आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता.