Gold Price Today: सोन्याचे दर हे गेल्या काही दिवसांपासून घसरत होते परंतु आता सोन्याचे दर (Gold Rates) हे वाढले आहेत. आज सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. शुद्ध सोनं (24K) आज 61,150 प्रति 10 ग्रॅम इतके असून स्टॅडर्ड गोल्ड (22K) सोनं हे 56,050 रूपये प्रति 10 ग्रॅम इतके आहे. तेव्हा आता तुम्हाला सोनं खरेदी करण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून (Akshay Trutiya 2023) सोन्याच्या दरात चढउतार होत आहेत. कधी सोन्याचे दर हे घसरताना दिसत आहेत तर कधी सोन्याचे दर हे वाढताना दिसत आहेत. त्यामुळे ग्राहकांसाठी आधीच तळ्यात मळ्यात स्थिती असताना आता सोन्यानं विक्रमी दर गाठला आहे.
गुडरिटर्न्सच्या वेबसाईटनुसार, सोन्याचे भाव हे या महिन्यात 12 एप्रिलपासून चार वेळा वाढले आहेत. 12 एप्रिलच्या दिवशीच सोन्याचे भाव हे 61,310 रूपये प्रति 10 ग्रॅम (24 कॅरेट) इतके होते जे 550 रूपयांनी वाढले होते. त्यानंतर सोन्याचे भाव हे 14 एप्रिल रोजी 61,800 रूपये प्रति 10 ग्रॅम इतके होते. 19 एप्रिल रोजी सोन्याचे दर हे 61,150 रूपये प्रति तोळा इतके होते त्यानंतर आज हेच भाव मोठ्या चढउतारानंतर 61,150 रूपयांनी वाढले आहेत. (Gold rates increses one day before akshaya trutiya 2023 check the latest price in your city)
उद्या अक्षय्य तृतीयेचा सण आहे आणि आपण सगळेच एव्हाना अक्षय्य तृतीयेच्या निमित्तानं सोनं खरेदी केलं असेलच परंतु आता ज्यांची अजूनही सोनं खरेदी राहिली आहे त्यांच्यासाठी ही एक मोठी बातमी आहे. मुंबईतील सोन्याचे दर हे वाढले आहे. कालच्या तुलतेन आज सोन्यानं विक्रमी (Gold Price Hike) पातळी ओलांडली आहे. त्यामुळे सणासुदीच्या एक दिवस आधी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. तेव्हा तुम्हीही आज सोनं खरेदी करण्यासाठी बाहेर पडत असाल तर आजचं तुमच्या शहरातील दर जाणून घ्या.
कोल्हापूर - 6,093 रूपये प्रति 1 ग्रॅम
नाशिक - 5,068 रूपये प्रति 1 ग्रॅम
पुणे - 5,605 रूपये प्रति 1 ग्रॅम
सोलापूर - 5,605 रूपये प्रति 1 ग्रॅम
वसई-विरार - 5,608 रूपये प्रति 1 ग्रॅम