Gold Rate Today | दसरा जवळ असल्याने सोन्याच्या दरात उसळी; जाणून घ्या आजचे दर

भारतीय सराफा बाजारात आज (13 ऑक्टोबर) सोन्याच्या दरांमध्ये तेजी दिसून आली. तसेच चांदीच्या दरांमध्येही वाढ झाली.

Updated: Oct 13, 2021, 01:34 PM IST
Gold Rate Today | दसरा जवळ असल्याने सोन्याच्या दरात उसळी; जाणून घ्या आजचे दर title=

मुंबई : भारतीय सराफा बाजारात आज (13 ऑक्टोबर) सोन्याच्या दरांमध्ये तेजी दिसून आली. तसेच चांदीच्या दरांमध्येही वाढ झाली.  मागील कराही दिवसांमध्ये सोन्याच्या दरांमध्ये सतत घसरण नोंदवली गेली. त्यानंतर आज सोने रेकॉर्ड उच्चांकीवरून 9059 रुपयांनी स्वस्त ट्रेड करीत आहे.  सणासुदीच्या दिवसांमध्ये अपेक्षेप्रमाणे सोन्याच्या दरांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX)आज डिसेंबर डिलिवरीच्या सोन्यामध्ये तेजी दिसून आली. MCX वर सोन्याचे दर दुपारी 1 वाजता 47 हजार 267 रुपये प्रति तोळे इतक्या दरांवर ट्रेड करीत होते. तर चांदीदेखील 62 हजार 011 रुपये प्रति किलोवर ट्रेड करीत होती.

मुंबईतील सोन्याचे आजचे दर

22 कॅरेट 46 हजार 030 रुपये प्रति तोळे
24 कॅरेट 47 हजार 030 रुपये प्रति तोळे

मुंबईतील चांदीचे दर 61 हजार 800 रुपये प्रति किलो 

भारतीय बाजारात सण-समारंभाच्या दिवसांमध्ये सोन्याची मागणी असते. सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे. शुक्रवारी येणाऱ्या दसऱ्याच्या निमित्ताने ग्राहकांनी सोने खरेदीची लगबग सुरू केली असेल. त्यानंतर काही दिवसांनी दिवाळीचा सण आहे. त्यामुळे आता येत्या दिवसांमध्ये सोन्याची मागणी वाढेल. आणि किंमतींमध्येही वाढ होऊ शकते.

त्यामुळे एमसीएक्ससह देशातील रिटेल-होलसेल बाजारात सोन्याच्या दरांमध्ये काहीशी तेजी दिसून येत आहे.

(वर दिलेलेल सोने- चांदीचे दर कोणतेही कर न आकारता देण्यात आले आहेत. स्थानिक बाजारपेठांनुसार दरांमध्ये बदल होऊ शकतो)