आज सोनं स्वस्त झालं की महाग? जाणून घ्या 18,22 आणि 24 कॅरेटचे भाव

Gold Rate Today In Maharashtra: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे. वाचा आजचे 18,22 आणि 24 कॅरेटचे भाव   

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 8, 2024, 11:01 AM IST
आज सोनं स्वस्त झालं की महाग? जाणून घ्या 18,22 आणि 24 कॅरेटचे भाव  title=
gold rate today 8 august and gold silver price fall in india check latest price

Gold Rate Today In Maharashtra: या आठवड्यात सातत्याने सोन्याच्या दरात घसरण होत आहे. आजही सोनं-चांदी स्वस्त झालं आहे. अनेक शहरांत सोन्याचे दर 500 रुपयांपर्यंत घसरले आहेत. आज गुरुवार 8 ऑगस्ट रोजी मुंबई आणि कोलकत्ता येथे 24 कॅरेट सोन्याचे दर 69,260 रुपये प्रतितोळा आहे. तर, चांदीचे दर 81,900 रुपये प्रति किलोग्रॅम इतके आहेत. सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरू असल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याने सोन्याचे दर गडगडले होते. त्यातच, सरकारने सोन्यावरील सीमा शुल्कात कपात केल्यानंतर त्याचाही बराचसा परिणाम सोन्याच्या किंमतींवर झाला होता. बुधवारी स्थानिक सराफा बाजारात सोन्याचे भाव 350 रुपयांनी कमी होऊन 71,350 प्रतितोळावर स्थिरावला आहे. तर, मागील सत्रात 99.9 टक्के शुद्धता असलेले सोनं 71,700 रुपये 10 ग्रॅमवर स्थिरावले होते. अखिल भारतीय सराफा संघाने दिलेल्या माहितीनुसार, चांदीच्या किंमतीत पुन्हा एकदा तेजी आली आहे. मागील सत्रात चांदी 200 रुपयांच्या तेजीसह 82,200 रुपये प्रतिकिलोग्रॅमवर स्थिरावली होती. तर, मागील सत्रात चांदी 82,000 रुपये प्रति किलोग्रॅमवर व्यवहार बंद झाला होता. 

असा आहे सोन्याचे दर

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  63,549 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  69, 260 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट   51,950 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   6, 350 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   6, 927 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 196रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   50, 800 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   55, 416रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    41, 568रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट-63,500 रुपये
24 कॅरेट-69, 270 रुपये
18 कॅरेट-51,960 रुपये