Gold Price Today: आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात सातत्याने घट होत होती. मात्र, शुक्रवारी सोन्याचे दर वाढले होते. त्यानंतर आज शनिवारीदेखील सोन्याच्या दरात वाढ कायम आहे. त्यामुळं ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. नवरात्र आणि दिवाळी तोंडावर असताना सोन्याचे भाव गडगडल्याने ग्राहकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. आज 24 कॅरेट सोनं प्रतितोळा 75 हजारांवर पोहोचलं आहे. इतकंच नव्हे तर चांदीच्या दरातही वाढ झाली असून प्रतिकिलो चांदी 93,000 वर पोहोचली आहे.
सध्या भारतात पितृ पंधरवडा सुरू आहे. त्यामुळं सोनं खरेदी करणं टाळलं जातं. मात्र, त्यानंतर येणारी नवरात्र आणि दसरा, दिवाळी या सणांमध्ये मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं जातं. अनेक भागात तर दसऱ्याच्या दिवशी सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे. अशातच सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. आज सोन्याने 75 हजारांचा पल्ला गाठला आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात आज 820 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळं आज सोन्याचा भाव प्रतितोळा 75,930 रुपयांवर पोहोचला आहे.
22 कॅरेट सोन्याच्या दरात 750 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 69,600 रुपयांवर स्थिरावलं आहे. तर, 18 कॅरेट सोन्याच्या दरात 620 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा 56,950 रुपयांवर पोहोचलं आहे.
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 69,600 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 75,930 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 56, 950 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 6,960 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7, 593 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5, 695 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 55, 680 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 60, 744 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 45, 560 रुपये
22 कॅरेट- 69,600 रुपये
24 कॅरेट- 75,930 रुपये
18 कॅरेट- 56, 950 रुपये