सोन्याच्या भावाचं काय झालं, आताच खरेदी करा, कारण पुन्हा घडणार इतिहास

डॉलरच्या तुलनेत आज सोन्याच्या किंमतीत 317 रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे.

Updated: May 5, 2021, 05:53 PM IST
सोन्याच्या भावाचं काय झालं, आताच खरेदी करा, कारण पुन्हा घडणार इतिहास title=

मुंबई : डॉलरच्या तुलनेत आज सोन्याच्या किंमतीत 317 रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे. दिल्लीच्या सराफ मार्केटमध्ये आज सोन्याचा भाव 317 रुपयांनी घसरून, प्रति दहा ग्रामवर 46 हजार 382 रुपयांवर बंद झाला आहे. मागील सत्रात सोन्याचा भाव 46 हजार 699 वर बंद झाला होता. कमोडिटी मार्केटमधील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, किंमतीत झालेल्या घसरणेमुळे तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणुक करु शकतात. कारण पुन्हा एकदा 2020 चा इतिहास घडेल, कारण गेल्या वर्षी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याची किंमत 56 हजार 200 च्या सर्वाधिक पातळीवर पोचली होती.

जाणकारांच्या म्हणण्यानुसार, या दिवाळीपर्यंत MCXवर सोन्याचा दर 50 हजारांच्या पार जाईल. HDFC Securities चे वरिष्ठ कमोडिटी विश्लेषक तपन पटेल म्हणाले की, डॉलरची वाढ आणि अमेरिकन बॉन्ड उत्पन्नातील वाढ यामुळे सोन्याच्या किंमतीवर दबाव आला आहे. डॉलर इंडेक्स दुपारी 4.22 वाजता 0.276 च्या फरकाने  91.203 वर चढला.

एकीकडे सोन्याची घसरण नोंदवली गेली, तर दुसरीकडे चांदीच्या किंमतीत आज मोठी वाढ झाली आहे. आज चांदी 2 हजार 328 रुपयांनी वाढून 70 हजार 270 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. मागील व्यापार सत्रात चांदी 67 हजार 942 रुपयांवर बंद झाली होती.

सोने चांदीचे आंतरराष्ट्रीय आणि वितरण दर

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे दर सध्या 1 हजार 776 डॉलर आणि चांदीमध्ये खूप कमी प्रमाणात घसरण होऊन 26.36 डॉलर्सने घसरले आहेत. MCXवर, सध्या जून डिलीव्हरीमधील सोन्याचा भाव 35 रुपयांनी घसरून 46 हजार 386, ऑगस्टच्या डिलीव्हरीमधील सोन्याचा 33 रुपयांनी घसरून 47 हजार 164 रुपये प्रति दहा ग्रॅम पातळीवर व्यापार झाला आहे.

काही सत्रांमध्ये घट होऊ शकते

कमोडिटी अँण्ड करन्सी रिसर्चचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी असे म्हटले की, सोनं पुन्हा वाढेल हे निश्चित आहे. अशा परिस्थितीत, जर तो खाली पडत असेल तर, त्याला संधी म्हणून पाहिले पाहिजे. पुढील काही व्यापार सत्रे कदाचित त्यांचे भाव कमी होतच राहतील, म्हणून ही गुंतवणूक करण्याची एक उत्तम संधी आहे. ते म्हणतात की, दिवाळी 2021 पर्यंत सोने पुन्हा एकदा 50 हजारांच्या पुढे जाईल.