मुंबई : युक्रेनमधील युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावर रशियाने केलेल्या हल्ल्यानंतर जागतिक बाजारपेठेवर त्याचे नकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याने सोन्याचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. तर दुसरीकडे कच्च्या तेलाच्या किमतीतही वाढ सुरूच आहे.
मल्टीकमोडीटी एक्सचेंजवर सोन्याचे भाव 51950 रुपये प्रति तोळेवर ट्रेड करीत होते. तर चांदी 68309 प्रति किलोवर ट्रेड करीत होती. सध्या भारतात लग्न सराईचे दिवस आहेत. सोन्याचे वाढलेले भाव लोकांचा खिसा रिकामा करीत आहेत.
मुंबई 52,040 प्रति तोळे
पुणे 52,110 प्रति तोळे
नागपूर 52,100 प्रति तोळे
नाशिक 52,100 प्रति तोळे
जळगाव 52,100 प्रति तोळे
सोन्याचे दरांबाबत भारतीयांमध्ये नेहमीच कुतूहल असते. आंतरराष्ट्रीय घडामोडी, अर्थकारण, तसेच देशातील मागणी पुरवठ्याचा सोन्याच्या दरांवर परिणाम होत असतो. सोन्याच्या किंमतींमध्ये नेहमीच चढ उतार होत असते. आज सोन्याचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत.
ऑगस्ट 2021 मध्ये सोन्याचे दर 55 हजार प्रतितोळेच्या पुढे गेले होते. येत्या काही महिन्यात सणासुदीचे दिवस सुरू होणार आहेत.
त्यामुळे सोने काही महिन्यात आणखी उसळी घेऊन गेल्या वर्षीचा उच्चांक गाठू शकते असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.