Gold Price Today: सोनं-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होताना दिसत आहे. अर्थसंकल्पानंतर सोनं तब्बल 500 हजारांपर्यंत घसरण झाली आहे. आजही सोन्याच्या दरात घट झालेली पाहायला मिळतेय. इंडियान बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, शुक्रवारी सोन्याचा दर 68,227 रुपयांवर स्थिरावला होता. तर, चांदी 81,474 रुपये प्रति किलो इतकी आहे. शुक्रवारी सोनं-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घट झाल्याने ग्राहकांनाही दिलासा मिळाला आहे. सोनं खरेदी करणाऱ्यांची इच्छा असणाऱ्या ग्राहकांसाठी हिच सुवर्ण संधी आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात सोनं-चांदीवरील कस्टम ड्युटीत घट झाल्यानंतर मौल्यवान धातुचे दर कोसळले आहेत. त्याचबरोबर, आतंरराष्ट्रीय स्तरावरही सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळं व्यापाऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. स्थानिक सराफा बाजारातही सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. सलग तिसऱ्या दिवशी सोनं 99.9 टक्के आणि 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याच्या दरातही 1 हजार रुपयांपर्यंतची घट झाली आहे. तर, मागील सत्रात चांदीचे दरही घसरले होते.
गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने सोन्याच्या दरात घट होत आहे. आत्तापर्यंत तब्बल 5 हजारांपर्यंत सोनं घसरलं आहे. ही आत्तापर्यंतची सर्वात निच्चांकी घसरण आहे. मंगळवारी सरकारने अर्थसंकल्पात सोने आणि चांदीसह अनेक उत्पादनांवरील सीमाशुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला होता. आंतरराष्ट्रीय बाजारातील कमकुवत ट्रेंड दरम्यान स्थानिक ज्वेलर्सकडे सोन्याची मागणी वाढल्याने सोन्याचे भाव घसरल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
सराफा बाजारात सोन्याचा भाव आणखी कमी झाला आहे. शुक्रवारी सकाळच्या सत्रात २२ कॅरेट सोने ६४,१५० रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ६९,९५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. त्याचवेळी, किलोभर चांदीसाठी ग्राहकांना ८४,५०० रुपये खर्च करावे लागतील.