मोठा दिलासा! अर्थसंकल्पापूर्वीच सोनं झालं स्वस्त; 18, 22, 24 कॅरेटचा भाव जाणून घ्या

Gold Price Today In Marathi: आज सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. जाणून घेऊया सोन्याचा आजचा भाव

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 23, 2024, 11:09 AM IST
मोठा दिलासा! अर्थसंकल्पापूर्वीच सोनं झालं स्वस्त; 18, 22, 24 कॅरेटचा भाव जाणून घ्या  title=
Gold Price Today on 23rd July 2024 gold rates fall silver slips before budget 2024

Gold Price Today In Marathi: मंगळवार 23 जुलै रोजी केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला जाणार आहे. मात्र, बजेट सादर होण्यापूर्वी सोन्या चांदीच्या दरात आज घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय. 21 कॅरेट सोनं प्रतितोळा 73,580 रुपयांवर पोहोचलं आहे. आज तब्बल 270 रुपयांची घसरण झालं आहे. तर, चांदीच्या दरात आज 338 रुपयांची घट झाल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर आज चांदीचे दर 88,865 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिर झाली आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारातील मजबूतीचा कल आणि स्थानिक ज्वेलर्सकडून नवीन मागणी यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 18 जुलैपासून गेल्या चार सत्रांमध्ये चांदी 3,400 रुपयांनी घसरली आहे. 18 जुलै रोजी तो 400 रुपयांनी घसरून 94, 000 रुपये प्रति किलोवर बंद झाला. 

आज 22 कॅरेट सोन्याच्या दरातही 250 रुपयांची घट झाली आहे. आज 10 ग्रॅम प्रतितोळा 67,450 रुपयांवर पोहोचले आहे. 18 कॅरेट सोन्याचे दर 55,190 रुपयांवर पोहोचले आहे. 18 कॅरेटच्या दरात 200 रुपयांची घट झाली आहे. 

असा आहे सोन्याचे दर

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट   67, 450 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट   73, 580 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट   55, 190 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   6,745 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7,358 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5,519  रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   53, 960 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   58, 864  रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    44,152  रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट-  67, 450 रुपये
24 कॅरेट-  73,580 रुपये
18 कॅरेट- 55,190 रुपये