Gold Price Today: आज महागाई प्रत्येक ठिकाणी वाढलेली दिसते आहे. त्यामुळे त्याची झळ ही सोन्याच्या किंमतीवरही लागलेली पाहायला मिळते आहे. सोन्याच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची दिसते आहे. आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात वाढ झालेली दिसते आहे. आज सोन्याचे दर हे 60 हजाराच्या पार आहेत त्यामुळे आता सोनं खरेदी करताना तुम्हाला अधिक पैसे भरावे लागणार आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आज शुद्ध सोन्याचे दर हे 60,940 रूपये प्रतितोळा आहेत.
तर 22 कॅरेट सोन्याचे दर हे 55,860 रूपये प्रतितोळा आहेत. कालच्यापेक्षा शुद्ध सोन्याचे भाव हे 10 रूपयांनी वाढले आहेत. कालच्या पेक्षा हा भाव बराच कमी आहे. काल सोन्याच्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचा दर हा 400 रूपयांपर्यंत वाढले होते. आपण खरेदी करताना नेहमीच 24 कॅरेट सोनं खरेदी करतो. त्यासाठी हे भाव आपल्याला जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. फेब्रुवारीपासून सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाल्याची पाहायला मिळते आहे. सोनं हे 60 च्या पार पोहचले होते. त्यामुळे आपल्यालाही सोनं खरेदी करण्यासाठी बरेच व्यवस्थापन करावे लागते.
सध्या सोन्याच्या किमती ही वाढलेल्या दिसत आहेत. असं असलं तरी मे महिन्याच्या शेवटी मात्र सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी घट झाल्याची दिसते आहे. परंतु अद्यापही सोन्याच्या किमती या घसरल्या आहेत. सोनं हे 60 च्या पारही अजूनही आहे. 28 आणि 29 मे रोजी सोन्याच्या किमतींमध्ये बदल झालेला नव्हता. या किमती 60,600 रूपयांवर होत्या. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 मे रोजी सोन्याच्या किंमती या 110 रूपयांनी खाली गेल्या होत्या परंतु आता परत या किमती वाढलेल्या दिसत आहेत.
हेही वाचा - कैसे हुआ, कब हुआ? सिक्स पॅक बॉडी असणारे बॉलिवूडचे 'हे' हिरो झाले इतके जाड; AI फोटोंची कमाल
गुडरिटर्न्सनुसार, 1 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याच्या किंमती या आज 5,586 रूपये इतक्या आहेत. तर 8 ग्रॅम सोन्याच्या किमती या 44,688 रूपये इतक्या आहेत. तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत ही 55,860 रूपये इतकी आहे. 100 ग्रॅम सोनं हे 5,58,500 रूपये इतके आहे. तर 24 कॅरेट सोन्यासाठी आज 1 ग्रॅम सोन्याची किंमत ही 6,094 रूपये इतकी आहे. तर 8 ग्रॅम सोन्याची किंमत ही 48,752 रूपये इतकी आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेटची किंमत ही 60,940 रूपये इतकी आहे. तर 100 ग्रॅम सोन्याची किंमत ही 6,09,400 रूपये इतकी आहे.